चिंचोलीत विद्यार्थ्यांना दूधवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:33 AM2018-07-17T01:33:03+5:302018-07-17T01:33:20+5:30
दुधाला प्रतिलिटर पाच रु पयांचा वाढीव दर मिळावा यासाठी सुरू झालेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील शेतकऱ्यांनी संकलन केंद्र बंद ठेऊन पाठिंबा दिला आहे.
नायगाव : दुधाला प्रतिलिटर पाच रु पयांचा वाढीव दर मिळावा यासाठी सुरू झालेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील शेतकऱ्यांनी संकलन केंद्र बंद ठेऊन पाठिंबा दिला आहे. राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीसाठी सुरू केलेल्या आंदोलनात सिन्नर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकºयांनी संकलन केंद्र बंद ठेऊन पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान दूध उत्पादकांना शासनाची तीन रु पये दरवाढ मान्य नसल्याचे संघटनेचे आंदोलन जोपर्यंत सुरू राहील तोपर्यंत सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी संकलन केंद्रावर दूध देणार नसल्याचे शेतकºयांनी जाहीर केले. आज आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी येथील दूध उत्पादक शेतकºयांनी संकलन केंद्रावर दूध न देता जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप, सरपंच रोहिणी आव्हाड, माजी सरपंच संजय सानप, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू नवाळे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दत्तू नवाळे, नितीन आव्हाड, प्रशांत सानप, राजू सानप, भीमा गिते, रामनाथ भाबड, वाळू लांडगे, गंगा नवाळे, दत्तू शिरसाठ आदीनी संपूर्ण दूध एकत्रित करून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व गावातील आदिवासी व गरजू लोकांच्या वस्तीत वाटून दिले.