दसाण्याचे पुरपाणी पेटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 06:29 PM2018-08-19T18:29:59+5:302018-08-19T18:30:46+5:30

दसाणा धरणाचे पुरपाणी पाटाद्वारे कोणत्याही परिस्थितीत यापुढील गावांसाठी जाऊ देणार नाही, अशी आक्र मक भूमीका विरगाव येथील शेतकरीवर्गाने घेतल्याने लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गाला रविवारी अखेर हात हालवत परत फिरण्याची नामुष्की आली.

 Dissolving Benefit signs | दसाण्याचे पुरपाणी पेटण्याची चिन्हे

दसाण्याचे पुरपाणी पेटण्याची चिन्हे

Next

विरगाव : दसाणा धरणाचे पुरपाणी पाटाद्वारे कोणत्याही परिस्थितीत यापुढील गावांसाठी जाऊ देणार नाही, अशी आक्र मक भूमीका विरगाव येथील शेतकरीवर्गाने घेतल्याने लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गाला रविवारी अखेर हात हालवत परत फिरण्याची नामुष्की आली. यामुळे यापुढील भागातील शेतकरीवर्गही आता आक्र मक झाला असून दसाणा धरणाच्या पुरपाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी या शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे परीसरात पुरपाणी पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.  पुरपाणी सुकड नाल्यात टाकून परिसरातील छोटे मोठे बंधारे भरून द्यावेत अशी मागणी या परिसरातील शेतकरीवर्गाने संबंधीत विभागाकडे केली होती. यासाठी परिसरातील तरसाळी, औंदाने, वनोली, यशवंतनगर या पाच ते सहा गावातील शेतकरीवर्गाने शुक्र वारी (दिं.१७) एकत्र येत खासदार, आमदार यांची सटाणा येथे भेट घेऊन याप्रश्नी तात्काळ मार्ग काढण्याची विनंती केली होती. याच मागणी नुसार रविवारी तालुका लघु पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने विरगाव येथे भेट देऊन पाणी सुकड नाल्यात टाकण्यासाठी स्थानिक शेतकरी वर्गाची भेट घेऊनअडचणींबाबत चर्चा केली.  मात्र यावेळी विरगाव येथील शेतकºयांनी कोणत्याही परिस्थितीत पुरपाणी आम्ही पाटाद्वारे जाऊ देणार नाही. आमचे हक्काचे पाणी पळविण्याचाच हा डाव असल्याचा आरोप करत अधिकारी वर्गाला तीव्र विरोध केला. यामुळे अधिकाºयांना चक्क हात हालवत परत फिरावे लागले. यामुळे पुढील गावातील शेतकरी वर्गाने संताप व्यक्त केला. याबाबतीत पुन्हा एकदा आमदार दीपिका चव्हाण यांची भेट घेतली असून पुरपाणी मिळाले नाही तर केळझर प्रमाणेच आम्ही रस्त्यावर उतरून लोकप्रतिनिधींचा निषेध करू असा इशारा दिल्याने आमदार याप्रश्नी काय भूमिका घेतात हे पाहणे रोचक ठरणार आहे.

Web Title:  Dissolving Benefit signs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.