जॉगिंग ट्रॅकवर डिस्टन्सचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:09 AM2020-09-10T00:09:50+5:302020-09-10T01:17:12+5:30

इंदिरानगर : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी राज्य शासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केले असताना प्रत्यक्षात मात्र सकाळ व सायंकाळी जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारणाऱ्या नागरिकांकडून मात्र नियमांचा भंग केला जात असून, फेरफटका मारणारे नागरिक घोळक्याने फिरत असल्याने तसेच ट्रॅकवर बसविण्यात आलेल्या ग्रीन जिमच्या सरावसाहित्याचा वापर करताना कोरोना संसर्ग होणार नाही याची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कसा रोखला जाणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.

Distance fuzz on the jogging track | जॉगिंग ट्रॅकवर डिस्टन्सचा फज्जा

जॉगिंग ट्रॅकवर डिस्टन्सचा फज्जा

Next
ठळक मुद्दे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इंदिरानगर : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी राज्य शासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केले असताना प्रत्यक्षात मात्र सकाळ व सायंकाळी जॉगिंग ट्रॅकवर फेरफटका मारणाऱ्या नागरिकांकडून मात्र नियमांचा भंग केला जात असून, फेरफटका मारणारे नागरिक घोळक्याने फिरत असल्याने तसेच ट्रॅकवर बसविण्यात आलेल्या ग्रीन जिमच्या सरावसाहित्याचा वापर करताना कोरोना संसर्ग होणार नाही याची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कसा रोखला जाणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
इंदिरानगर परिसरातील नागरिकांसाठी वडाळागावाकडून येणाºया पाटबंधारे खात्याच्या पाटावर महापालिकेने पंधरा वर्षांपूर्वी जॉगिंग ट्रॅक तयार केला असून, या ट्रॅकवर आजपावेतो लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. इंदिरानगर, विनयनगर साईनाथनगर, दीपालीनगर, सुचितानगरसह परिसरातील आबालवृद्ध दररोज सकाळ व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी या ट्रॅकचा उपयोग करतात. त्याचा वाढता वापर पाहून महापालिकेने या ठिकाणी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाने जॉगिंग ट्रॅक, उद्यानांचा वापर सार्वजनिक वापरासाठी बंद केला. सलग सहा महिने ट्रॅक बंद असल्याने फिरण्यासाठी येणाºया नागरिकांची गैरसोय झाली, मात्र त्यानंतर शासनाने जॉगिंग ट्रॅक जनतेसाठी खुले केले; परंतु या ठिकाणी येणाºया नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे तसेच सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र काही दिवसांपासून पुन्हा जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. जॉगिंग ट्रॅकची दयनीय अवस्था झाल्याने सध्या जॉगिंग ट्रॅकच्या नूतनीकरणाचे काम सुरू असले तरी, ट्रॅकच्या बाजूने फिरण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. एकमेकांशी गप्पा मारणे, सुरक्षित अंतर न राखता फिरणे असे प्रकार होऊ लागले असून, मास्कचा वापरदेखील करणे बंद झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Distance fuzz on the jogging track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.