विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:57 AM2018-03-13T00:57:24+5:302018-03-13T00:57:24+5:30
एक महिला शिकली तर एक पिढी शिकते त्यामुळे मुलींना शिक्षण द्या, घरातही महिलांचा सन्मान करा, महिलांनी आपले आरोग्य निरोगी, आनंदी राहण्यासाठी वेळेवर जेवण, नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. नीलिमा बागुल यांनी केले.
नाशिकरोड : एक महिला शिकली तर एक पिढी शिकते त्यामुळे मुलींना शिक्षण द्या, घरातही महिलांचा सन्मान करा, महिलांनी आपले आरोग्य निरोगी, आनंदी राहण्यासाठी वेळेवर जेवण, नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. नीलिमा बागुल यांनी केले. जेलरोड कलानगर येथे महाराष्टÑ नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सावित्रीबई फुले स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाºया महिलांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी डॉ. बागुल बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदिती ढिकले, वैशाली धनवटे, मीरा तुंगार, प्रा. लता पवार, सुरेखा कोल्हे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाºया श्रीमता भट, मीना कटारे, रेखा गोतिसे, वैशाली राठोड, ज्योत्स्ना देसाई, चित्रा बिडवे, सोनाली सोनजे, सुलभा राजुरकर, माधवी जळगावकर, माया जगताप, रेखा पांडव, प्रतीक्षा ्कवीश्वर, रु ंचा थोरात आदि महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संध्या सोनजे यांनी केले. यावेळी निखिल जोशी, संतोष क्षीरसागर, विजय बिडवे, संदीप भवर, नितीन धानापुणे, उमेश भोई, सागर दाणी, शशी चौधरी, पंकज सोनवणे, शैलेंद्र वडजे, तुषार वाडीले, स्वप्नील शिंदे, मयूर कटारे, गुड्डू शेख, आदित्य कुलकर्णी आदी उपस्थित होते.