ऊसाला बोलीप्रमाणे भाव न दिल्याने संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 07:00 PM2018-12-08T19:00:02+5:302018-12-08T19:01:29+5:30
लोहोणेर : बंद अवस्थेत असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना डी. व्ही.पी. संचलित धाराशिव साखर कारखान्याने भाडे तत्वावर चालविण्यास घेतला असून सदर कारखाना चालू होऊन सुमारे एक महिन्यांचा कालावधी उलटला असून गव्हाण पूजनाच्या दिवशी अध्यक्ष अभिजित पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे अद्यापही गाळपास आलेल्या ऊसाला जाहीर केलेल्या बोलीप्रमाणे भाव न दिल्याने वसाकास ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

वसाकाच्या भाडेकरू संस्थेने म्हणजेच धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिनांक ११ नोव्हेंबर रोजी गव्हाण पूजनाच्या दिवशी आपण इतर लगतच्या कारखान्याच्या तुलनेत एक रु पया जास्त भाव देऊ असे जाहीर केले होते. मात्र या घोषणेला एक महिना पूर्ण झाला असला तरी अद्याप २००० रु पयापेक्षा जास्त भाव न दिल्याने ऊस उत्पादक, पुरवठादार शेतकरीवर्गात संभ्रम निर्माण झाला आहे.
या उलट वसाका शेजारील द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याने २३७१ रु पये इतका भाव जाहीर केला असून रोख स्वरूपात पेमेंट अदा करण्यास सुरुवात केली आहे. वसाका व द्वारकाधीश यांच्या पेमेंट मध्ये सुमारे ३७१ रु पयांची तफावत जाणवत असून वसाका कारखाना हे उर्वरित पेमेंट कधी देणार याकडे ऊस पुरवठादार शेतकºयांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
वसाकाने शुक्रवार पर्यत सुमारे ४७,७६० मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून सुमारे ३३,७०० पोते साखर निर्माण केली आहे. सरासरी साखर उतारा ७.६४ टक्के इतका मिळाला आहे. वसाकाच्या व्यवस्थापन मंडळ हे सध्या तरी कार्यक्षेत्रातील उसा ऐवजी गेटकेनचा ऊस गाळप करण्यात धन्यता मानत असून कार्यक्षेत्रातील आजी, माजी संचालक ज्यांनी वसाकावर १०-१५ वर्ष सत्ता भोगली ते सुद्धा आपला ऊस तुटावा म्हणून वसाकात खेटे घालीत आहेत. ज्या प्रमाणे वसाका शेजारील द्वारकाधीश साखर कारखान्याने २३७१ रु पये प्रति टन भाव दिला त्याच प्रमाणे वसाकाने सुध्दा जाहीर केल्या प्रमाणे ऊस भाव द्यावा व ज्यांनी या आधी ऊस पुरवठा केला असेल त्यांना उर्वरित पेमेंट अदा करावे अशी मागणी ऊस पुरवठादार शेतकºयांनी केली आहे. (वसाकाचा फोटो वापरणे)