वाहतुकीच्या नियकांकरीता ग्रामिण पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेरे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 10:53 PM2019-07-27T22:53:45+5:302019-07-27T22:54:03+5:30
नाशिक : वाहतुक पोलिसांसाठी महत्वपुर्ण ठरणारे बॉडी वॉर्न कॅमेरे अखेर ग्रामीण पोलिस दलास उपलब्ध झाले. ग्रामीण पोलिस मुख्यालयात प्रातिनिधीक स्वरुपात शुक्रवारी सुमारे ४० पोलिसांना कॅमेऱ्यांचे वाटप करण्यात आले. या कॅमेऱ्यांमुळे वाहतुक पोलिसांवर होणारे हल्ले, वादाचे प्रसंग कमी होवून दंड वसुलीच्या कामात देखिल पारदर्शकता येण्यास मोठी मदत होणार आहे.

रस्त्यावर थांबून वाहतुकीचे नियोजन करणाºया वाहतुक पोलिसांना नेहमीच वादावादी, अरेरावी अया काही प्रसंगांना सामोरे जावे लागते. काही प्रसंगांमध्ये नागरीक पोलिसांवर हल्ले करतात, तर कधी कधी पोलिसही नियमबाह्य वागतात हे या कॅमेºयामध्ये बंदीस्त होणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख्य तालुक्यातील शहरात गर्दीच्या ठिकाणी वाहनचालक व पोलिस यांच्यात सतत वाद होत असतात. तसेच वाहतुक पोलिसांवर देखिल पैसे घेण्याचे आरोप होत असतात.
या पार्श्वभुमीवर नाशिकच्या ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस दलातील वाहतुक पोलिसांसाठी पोेलिस ठाणे निहाय ४० बॉडी वॉर्न कॅमेºयांचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस उपअधिक्षक सुरेश जाधव, शशिकांत शिंदे, सदाशिव वाघमारे यांच्यासह जिल्ह्यातील पोलिस स्टेशनचे अधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
चौकट....
वाहतुक विषय हा सामाजिक पश्न असून यात पोलिस आणि नागरीक यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवतात. डिजिटल कार्यपध्दतीमुळे यास आळा घालण्याचा प्रयत्न असून पोलिसांचेही काही चुकत असल्यास त्यांच्यावर देखिल कारवाई होवू शकते. बॉडी वॉर्न कॅमेºयांमुळे वाहतुक शाखेच्या कामात पारदर्शकता येईल, शिवाय कायदा हातात घेणाºयांना जबर बसेल. हे कॅमेरे वाहतुक पोलिसांच्या वर्दीवर असणार आहे. त्यामुळे एकाच वेळी सद्या ४० कॅमेरे विविध भागातील दृष्य कॅमेºयात कैद करु शकतील. या कॅमेºयाचे व्हिडीओ फुटेज् पुरावे म्हणून सादर केले जावू शकतील. दंगली, राजकीय सभा, आंदोलने, मारामाºया, छापेमारी अश्या वेळी सुध्दा या कॅमेºयाचा विशेष वापर केला जाणार आहे.
(फोटो २७ ग्रामीण पोलिस)