मौजे सुकेणे विद्यालयात विद्यार्थ्यांना धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 09:19 PM2020-03-31T21:19:09+5:302020-03-31T21:19:53+5:30
कसबे सुकेणे : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेणे विद्यालयातील इ. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या अन्नधान्यामध्ये तांदूळ, मूगडाळ, तूरडाळ, मटकी, हरभरा यांचा समावेश आ
कसबे सुकेणे : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेणे विद्यालयातील इ. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासनाकडून प्राप्त झालेल्या अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या अन्नधान्यामध्ये तांदूळ, मूगडाळ, तूरडाळ, मटकी, हरभरा यांचा समावेश आहे.
या पोषण आहारांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला जवळपास ४ किलो ५०० ग्रॅम तांदूळ, अर्धा किलो मूगडाळ, १७५ ग्रॅम तूरडाळ, १०० ग्रॅम मटकी व ४०० ग्रॅम हरभरा याचे ६१२ मुले व ५६० मुली अशा एकूण ११७२ विद्यार्थ्यांना या पोषण आहारांतर्गत धान्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदा शिंदे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आचार्य प्रवर महंत सुकेणेकर बाबा, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स आधारे तोंडाला मास्क किंवा रुमाल लावून गर्दी न करता टप्प्याटप्प्याने नियोजनबद्ध वाटप करण्यात आले. शासनाच्या वतीने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो, मात्र सध्या शाळांना सुट्टी असल्याने हा पोषण आहार खराब होण्यापेक्षा विद्यार्थ्यांना वाटप करून तो सत्कारणी लागणार आहे, त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना एक प्रकारचा आधारच मिळणार आहे.
- महंत सुकेणेकर बाबा, शालेय समिती अध्यक्ष, मौजे सुकेणे