ग्रामपंचायतींना निधी वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:05 AM2020-09-09T01:05:34+5:302020-09-09T01:05:55+5:30
पंधराव्या वित्त आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ८२ कोटी रुपयांचा निधी नाशिक जिल्हा परिषदेस प्राप्त झाला असून, त्यातील ८० टक्के म्हणजेच ६५ कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या हप्त्यातील ६५ कोटी रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले असून, अशाप्रकारे १३० कोटी रुपयांची विकासकामे जिल्ह्यात होणार आहेत.
नाशिक : पंधराव्या वित्त आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ८२ कोटी रुपयांचा निधी नाशिक जिल्हा परिषदेस प्राप्त झाला असून, त्यातील ८० टक्के म्हणजेच ६५ कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या हप्त्यातील ६५ कोटी रुपये यापूर्वीच वितरित करण्यात आले असून, अशाप्रकारे १३० कोटी रुपयांची विकासकामे जिल्ह्यात होणार आहेत.
कोरोनाच्या काळात गेल्या सात महिन्यांपासून राज्य शासनस्तरावरून इतर योजनांमधून निधी उपलब्ध होण्यास अडचणी असताना केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या योजनेतून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकामी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, संनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची असणार आहे. विकासकामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे मंजूर असलेली विकासकामे सुरू करण्यास विलंब होत होता. सन २०२०-२१ या वर्षापासून आयोगाच्या निधीतून पंचायतराज संस्थांनी ग्रामपंचायतीच्या कामे व उपक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागाने दिलेल्या आहेत.
नाशिक जिल्हा परिषदेस पंधरावा वित्त आयोगांतर्गत पहिल्या व दुसºया हप्ताच्या प्राप्त निधीचे ग्रामपंचायतींना वितरित करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींचे वेगळे बँकखाते ग्रामपंचायत स्तरावर निर्माण करून प्रत्येक ग्रामपंचायतीस त्यांच्या हिश्शाचा प्रथम व द्वितीय हप्ता प्राप्त झाला आहे.
यापुढेही १५व्या वित्त आयोगाच्या वेळोवळी प्राप्त होणाºया निधीचे वितरण तात्काळ करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.