कोविड रुग्णालयास औषधे साहित्य वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:10 AM2021-03-30T04:10:23+5:302021-03-30T04:10:23+5:30
‘लाइफ गोज ऑन’ या संस्थेचे आदित्य काबरा, मानसी काबरा यांनी रुग्णांना मदत व्हावी, यासाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यास ...
‘लाइफ गोज ऑन’ या संस्थेचे आदित्य काबरा, मानसी काबरा यांनी रुग्णांना मदत व्हावी, यासाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत कारखान्याचे संचालक मुकुंद काबरा यांनी सीएसआर फंडातून आठ लाख ५० हजार रुपये किमतीचे साहित्य उपलब्ध करून दिले. रुग्णांवर तत्परतेने उपचार होण्यासाठी साहित्य उपयोगी ठरेल, याकरिता ही मदत देण्यात आली. सिन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ.वर्षा लहाडे यांनी मदतीचा स्वीकार केला. आदित्य काबरा यांच्यासह कारखान्याचे अरविंद आरोटे यांनी ही मदत डॉ.लहाडे यांच्याकडे सुपुर्द केली. दोडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी विजयकुमार पाटील यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गरजूंना मदत होण्यासाठी ‘लाइफ गोज ऑन’ या संस्थेच्या पेजला लाइक करण्याचे आवाहन आदित्य काबरा यांनी केले.
फोटो ओळी : २९ सिन्नर २
सिन्नर कोविड रुग्णालयास ॲडव्हान्स एन्झाइम कारखान्याकडून औषधे साहित्य देताना आदित्य कारबा, अरविंद आरोटे, वर्षा लहाडे, विजयकुमार पाटील आदी.
===Photopath===
290321\29nsk_5_29032021_13.jpg
===Caption===
सिन्नर कोविड रुग्णालयास ॲडव्हान्स एन्झाइम कारखान्याकडून औषधी साहित्य देताना आदित्य कारबा, अरविंद आरोटे, वर्षा लहाडे, विजयकुमार पाटील आदी