गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:41 AM2019-08-23T00:41:30+5:302019-08-23T00:42:09+5:30

आपण ज्या शाळेत शिकलो, खेळलो बागडलो व ज्ञान संपन्न केले या शाळेतील गुरुजनांमुळे जगातील प्रत्येक क्षेत्रात काम करू शकलो व त्या शाळेतील संस्कारामुळे समाजात आपले स्थान निर्माण करू शकलो अशा शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा या वाक्याप्रमाणे जनता विद्यालय सिन्नर सन १९९६-९७ या वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत गुरुवारी गणवेश वाटप केले.

Distribute uniforms to needy students | गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

सिन्नर येथील लोकनेते वाजे विद्यालयात माजी विद्यार्थ्यांकडून गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी संचालक हेमंत वाजे, कृष्णाजी भगत, भाऊसाहेब गोजरे, सुमनताई खुळे, मनीष गुजराथी, इंदूमती कोकाटे, पंढरीनाथ शेळके, राजेंद्र हंडोरे, प्रसाद हंडोरे, आदींसह विद्यार्थी.

googlenewsNext

सिन्नर : आपण ज्या शाळेत शिकलो, खेळलो बागडलो व ज्ञान संपन्न केले या शाळेतील गुरुजनांमुळे जगातील प्रत्येक क्षेत्रात काम करू शकलो व त्या शाळेतील संस्कारामुळे समाजात आपले स्थान निर्माण करू शकलो अशा शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा या वाक्याप्रमाणे जनता विद्यालय सिन्नर सन १९९६-९७ या वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत गुरुवारी गणवेश वाटप केले.
संचालक हेमंत वाजे, शालेय समिती अध्यक्ष कृष्णाजी भगत, भाऊसाहेब गोजरे, सुमनताई खुळे, मनीष गुजराथी, इंदूमती कोकाटे, पंढरीनाथ शेळके, राजेंद्र हंडोरे, प्रसाद हंडोरे, घनश्याम देशमुख, कल्पना कानडी, अर्जुन गोजरे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मधुकर गुळे, पालक-शिक्षक संघाच्या सोनाली कोकाटे, एम.आर. शिंदे, एस.एम. सोनवणे, पी.टी. शेळके, गंगाधर श्रीखंडे, शीतल काळे, सुचिता सातपुते, के.आर. गोसावी, अशोक मुरकुटे, व्ही.डी. सोनवणे, मारुती गोरडे, रोहिणी गोर्डे, के.बी. तांबे, सुरेश गिते, सविता पाटील, स्वाती गवळी, सरला आंधळे, वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कहांडळ, अभिनव बाल विकास मंदिर मुख्याध्यापक संगीता आव्हाड, बी.व्ही. शिंदे, पर्यवेक्षिका पी.डी. जाधव, पर्यवेक्षक बाजीराव नवले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
नवे गणवेश हातात मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या नव्या गणवेशामुळे त्यांचा शिक्षणात व संस्कारात मार्गक्रम सुखकर होईल हे निश्चित, असे मत माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

Web Title: Distribute uniforms to needy students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.