१४ हजार घरट्यांचे वाटप
By admin | Published: March 7, 2017 01:34 AM2017-03-07T01:34:17+5:302017-03-07T01:34:32+5:30
निसर्ग संवर्धनाचे काम करताना आपले पर्यावरण या संस्थेच्या स्वयंसेवकांनी चिमणी संवर्धनाचे कार्यदेखील हाती घेतले असून, मागील एक तपासापूसन त्यांनी हे सेवाव्रत सुरू ठेवले आहे
अझहर शेख नाशिक
निसर्ग संवर्धनाचे काम करताना आपले पर्यावरण या संस्थेच्या स्वयंसेवकांनी चिमणी संवर्धनाचे कार्यदेखील हाती घेतले असून, मागील एक तपासापूसन त्यांनी हे सेवाव्रत सुरू ठेवले आहे. टाकाऊ फर्निचरच्या तुकड्यांपासून तयार केलेले १४ हजार कृत्रिम घरट्यांचे मोफत वाटप केले आहे. त्यांचा कृत्रिम घरटी वाटपाचे अभियान आजही सुरू आहे.
आपल्या अंगणातून उडून गेलेल्या चिमण्या पुन्हा कशा अंगणात परततील या चिंंतेतून मंथन करीत सुचलेल्या संकल्पनेतून आपल्या पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड यांनी यशस्वी प्रयोग राबविला. फर्निचरच्या कामातून निघालेले टाकाऊ तुकडे फेकून न देता किंवा जाळून न टाकता दान करण्याचे आवाहन त्यांनी पर्यावरण प्रेमींना केले होते. त्यांच्या या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद लाभला. मिळणाऱ्या फर्निचरच्या तुकड्यांपासून त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने लाकडी घरटी तयार करण्यास सुरुवात केली. प्रारंभी दहा ते पंधरा घरटी तयार करुन त्यांनी स्वत:च्या ‘संस्कृती’ अपार्टमेंटमध्ये सुरक्षितरीत्या टांगली. त्यानंतर राहत्या सदनिकेच्या खिडक्यांपासून तर बाल्कनीपर्यंत एकूण वीस घरटी त्यांनी लावली.
एकूण चाळीस ते पन्नास घरटी त्यांनी अपार्टमेंटच्या परिसरात लावली. या घरट्यांचे दररोज निरीक्षण करण्यास सुरुवात केली. त्यातून संस्थेला चिमणी कृत्रिम घरातही राहू शकते याचा अंदाज आला.