‘समृद्धी’ प्रगतीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा१८५ हेक्टर ताब्यात : दोनशे कोटी रुपयांचे वाटप; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची पूर्वतयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 01:10 AM2017-11-10T01:10:04+5:302017-11-10T01:11:07+5:30
मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीच्या आजवरच्या परिस्थितीचा आढावा गुरुवारी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी नाशिक व नगरच्या जिल्हाधिकाºयांकडून जाणून घेतला.
नाशिक : मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी जमीन खरेदीच्या आजवरच्या परिस्थितीचा आढावा गुरुवारी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी नाशिक व नगरच्या जिल्हाधिकाºयांकडून जाणून घेतला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन तालुक्यातून १८५ हेक्टर जमिनीची खरेदी शेतकºयांकडून करण्यात आली असून, त्यापोटी सुमारे दोनशे कोटी रुपये जमीन मालकांच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत समृद्धीच्या प्रगतीबाबत राज्यातील अधिकाºयांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीची पूर्वतयारी म्हणून समृद्धीचा आढावा घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात समृद्धीला सर्वाधिक विरोध झालेल्या सिन्नर तालुक्यातच शेतकºयांचे मन वळविण्यात प्रशासनाला मोठे यश मिळाले असून, तालुक्यातील १७ गावांतील २९३ शेतकºयांची १३२.९६ हेक्टर क्षेत्र जागा थेट खरेदीने समृद्धीसाठी घेण्यात आली आहे. त्यापोटी १४९.७७ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. इगतपुरी तालुक्यात मात्र जमिनीसाठी राजी होण्याचे प्रमाण कमी आहे. १६ गावांतील १४७ शेतकºयांची ५३.३३ हेक्टर क्षेत्र जमीन खरेदी करण्यात आली असून, त्या पोटी ६५.५२ कोटी रुपये रक्कम देण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जानेवारी महिन्यात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याचे ठरविले आहे, तत्पूर्वी अधिकाधिक जमीन रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात दिली जावी यासाठी प्रशासनातील अधिकाºयांना बजावण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीत याच विषयावर चर्चा होणार असून, नाशिक जिल्ह्णात समृद्धी महामार्गाला विरोध करणाºया शेतकºयांचे प्रमाण अधिक असल्याने त्यादृष्टीने या बैठकीकडे साºयांचे लक्ष लागून आहे.