नाशिकरोडला ४०० रिक्षाचालकांकडून ८० हजारांचा दंडवसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:26 AM2018-11-20T00:26:00+5:302018-11-20T00:26:25+5:30
शहर वाहतूक शाखा व नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी रिक्षाच्या करण्यात आलेल्या तपासणीत ४०० रिक्षाचालकांकडून प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे ८० हजार रुपयांची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली.
नाशिकरोड : शहर वाहतूक शाखा व नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी रिक्षाच्या करण्यात आलेल्या तपासणीत ४०० रिक्षाचालकांकडून प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे ८० हजार रुपयांची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली. बिटको महाविद्यालयासमोर, नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर, जेलरोड कोठारी कन्या शाळा, सत्कार पॉर्इंट, देवळालीगाव, लॅमरोड भाटिया महाविद्यालय आदी ठिकाणी सोमवारी सकाळी १० वाजेपासून दुपारी १.३० वाजेपर्यंत शहर वाहतूक शाखा व संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांची रिक्षांची तपासणी सुरू केली. यामुळे काही ठिकाणी जेथे रिक्षाचालक रिक्षातील प्रवासी उतरून घेत निघून जात होते. पोलिसांनी विनाहेल्मेटधारी दुचाकीचालक व रिक्षाविरुद्ध मोहीम उघडल्याचा चालकांनी धस्का घेतला आहे.
४०० रिक्षाचालकांवर कारवाई
रिक्षांची कागदपत्रे, इन्शुरन्स, पीयूसी, रिक्षाचालकांचा परवाना, बिल, गणवेश याप्रकारे तपासणी करून नाशिकरोड, उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४०० रिक्षाचालकांकडून प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे ८० हजार रुपये तडजोड रक्कम वसूल करण्यात आली. नाशिकवरून नाशिकरोड रेल्वेस्थानकांवर येणाऱ्या रिक्षाचालकांची ६-७ ठिकाणी अडवून तपासणी करण्यात येत होती.