कानडी मळ्यात ‘अर्सेनिक अल्बम’चे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:19 AM2021-06-16T04:19:11+5:302021-06-16T04:19:11+5:30
------------------- वृद्धाश्रमास किराणा साहित्य भेट सिन्नर : येथील कर्पे क्रिकेट क्लब आणि फाउंडेशनने वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून अनाथ आजी-बाबा, ...
-------------------
वृद्धाश्रमास किराणा साहित्य भेट
सिन्नर : येथील कर्पे क्रिकेट क्लब आणि फाउंडेशनने वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून अनाथ आजी-बाबा, दिव्यांग आणि विकलांगांना किराणा साहित्याची मदत करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. कर्पे क्रिकेट क्लबच्या वतीने नाशिक येथील सुख-समृद्धी केअर सेंटर येथे अॅॅॅड. भगवान करपे, धनंजय शिंदे, सुदाम बोडके, नगरसेवक पंकज मोरे, प्रवीण पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३५ हजारांचे किराणा साहित्य केअर सेंटरला सुपुर्द करण्यात आले.
-----------------
५० महिलांना किराणा साहित्य वितरण
सिन्नर : कोविड संकटाच्या काळात ग्रामीण भागात रोजगार गमावून बसलेल्या तालुक्यातील ५० गरीब महिलांना पुणे येथील तथापि ट्रस्टच्या सहकार्याने युवा मित्रच्या वतीने कुटुंबाला १५ दिवस पुरेल अशा किराणा किटचे नुकतेच वितरण करण्यात आले. सनदी लेखापाल सौरभ यार्दी यांच्या हस्ते किट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी युवा मित्रच्या कार्यकारी संचालक मनीषा पोटे, सेक्रेटरी विलास पाटील, सहयोगी संचालिका शीतल डांगे यांची उपस्थिती होती.
--------------------
सिन्नर सार्वजनिक वाचनालयास दहा हजारांची देणगी
सिन्नर : येथील सिन्नर सार्वजनिक वाचनालयास आकाशाचार्य रमाकांत देशपांडे यांनी ५००१ रुपयांची देणगी दिली. शालेय जीवनात या वाचनालयाने आईप्रमाणे संस्कार केलेले आहेत. आम्ही या संस्कारामुळेच साहित्यक्षेत्रात उभे असून, वाचनालयाच्या या ऋणात सदैव राहू, असे देशपांडे यांनी सांगितले. तसेच वाचनालयास शिवाजी मुरकुटे यांनी वडील स्व. नामदेव मुरकुटे यांच्या स्मरणार्थ ५००१ रुपये देणगी दिली. देणगीचा स्वीकार वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी केला.
-------------------
ठाणगाव परिसरात दोनशे वृक्षांचे रोपण
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील जनसेवा मित्र मंडळाच्या वतीने परिसरात २०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. परिसरात आंबा, चिकू, नारळ, पेरू, रामफळ, सीताफळ, जांभूळ, फणस, निंब आदी झाडे लावण्यात आली. जनसेवाचे मार्गदर्शक मुकुंद काकड यांनी झाडे लावण्याचा निर्णय घेतलेला आहे, यावेळी मंडळाचे मार्गदर्शक अर्जुन आव्हाड, अध्यक्ष रामदास भोर, सदस्य दिनेश भोर, अजय बोडके, बाळासाहेब काकड, अक्षय घुगे, शंकर आमले, शुभम केदार, राहील मन्यार उपस्थित होते.