जिल्ह्यातील ३९३ शाळांना पुस्तकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 09:38 PM2020-10-30T21:38:28+5:302020-10-31T00:36:18+5:30
येवला : नाशिक जिल्ह्यातील ३९३ माध्यमिक शाळांना तब्बल ६० लाख रुपयांची पुस्तके वाटप करण्यात आली आहेत.
येवला : नाशिक जिल्ह्यातील ३९३ माध्यमिक शाळांना तब्बल ६० लाख रुपयांची पुस्तके वाटप करण्यात आली आहेत. या पुस्तकांमुळे जिल्ह्यातील शाळांची वाचनालये समृद्ध बनविली असून, जिल्ह्यातील शाळांना अजून ६० लाख रुपयांचे प्रिंटरचे वाटप होणार आहे. गेले दोन दिवस प्रत्येक तालुक्यात समारंभपूर्वक सर्व शाळांना पुस्तकांचे वाटप सुरू असून, येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयात तालुक्यातील ३५ शाळांना पुस्तक संच वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेवक दयानंद जावळे, पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पंडित मढवई, जिल्हा प्रतिनिधी सी.बी. कुळधर, दिनकर दाणे, प्राचार्य अशोक नाकील, जावेद अन्सारी, रामनाथ पाटील आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तालुक्यातील ३५ माध्यमिक शाळा प्रतिनिधींकडे यावेळी पुस्तकांचे संच वितरित करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. संतोष विंचू यांनी केले तर आभार सुनील गायकवाड यांनी मानले. यावेळी आमदार किशोर दराडे, युवा सेनेचे राज्य विस्तारक कुणाल दराडे, प्राचार्य जी.एस. येवले, प्रशासकीय अधिकारी समाधान झाल्टे, विजय चव्हाण, राजेंद्र पाखले, बाळकृष्ण पानसरे, सुरेश आहिरे, एस.एम. अलगट, दत्तात्रय गाडेकर, बापू आहेर, दीपक गायकवाड, ज्ञानेश्वर कदम, शशिकांत गायकवाड, आप्पासाहेब जमधडे, अंबादास सालमुठे, अरुण पैठणकर, सुशील गायकवाड, सुनील पवार, तुषार भागवत, प्रसाद गुब्बी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील पुस्तकांच्या वाटपाचे नियोजन स्वीय सहाय्यक हरिष मुंढे यांनी केले.