जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 09:13 PM2020-06-16T21:13:07+5:302020-06-17T00:23:28+5:30

नाशिक : शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकवर्गाकडून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे घरपोहोच वाटप करण्यात आले. यावेळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन करण्यात आले.

Distribution of books to primary and secondary school students in the district | जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकवाटप

जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकवाटप

Next

नाशिक : शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकवर्गाकडून जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे घरपोहोच वाटप करण्यात आले. यावेळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे पालन करण्यात आले.
मालेगाव मध्य : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या नसल्या तरी शहरातील मनपाच्या ७९ शाळांमधील पहिली ते सातवीच्या ८५ हजार ५९९ विद्यार्थ्यांसाठी पाच लाख २४ हजार ४० पुस्तकांचे मुख्याध्यापकांना वितरण करण्यात येत आहे. १५ जूनपासून सुरू होणाऱ्या शाळा अजून बंदच असून त्या केव्हा सुरू करण्यात येणार याबाबत स्पष्ट आदेश शासनाने दिले नसल्याने शिक्षक व पालक व विद्यार्थी वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनातर्फे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत देण्यात येणारी पाठ्यपुस्तके मनपाच्या शिक्षण विभागास प्राप्त झाली. त्याअनुषंगाने मनपा शिक्षण विभागातर्फे बुधवारपासून शहरातील उर्दू, मराठी व इंग्रजी माध्यमच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना पुस्तकांचे वितरण करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना पुस्तके घरपोच देण्यात येणार असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यानुसार महापालिकेच्या उर्दू माध्यमच्या ७७ व मराठीच्या दोन अशा ७९ शाळांतील ८५ हजार ५९९ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यात उर्दू माध्यमच्या ६०, माध्यमिक व मराठीच्या २८ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उर्दूच्या चार लाख ४९ हजार ८९, मराठीच्या ७१ हजार ३३१ तर इंग्रजी माध्यमच्या तीन हजार ६२० अशी एकूण पाच लाख २४ हजार ४० पुस्तके प्राप्त झाली आहे

Web Title: Distribution of books to primary and secondary school students in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक