कुंदेवाडी येथे आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्राचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:34 PM2018-02-09T23:34:42+5:302018-02-10T00:30:59+5:30
सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील आदिवासी बांधवांकरिता जात प्रमाणपत्र वितरण, महावितरण कंपनीतर्फे मोफत वीज कनेक्शन जोडणी व मतदार नोंदणी अभियानाचे मार्गदर्शन करण्यात आले.
सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील आदिवासी बांधवांकरिता जात प्रमाणपत्र वितरण, महावितरण कंपनीतर्फे मोफत वीज कनेक्शन जोडणी व मतदार नोंदणी अभियानाचे मार्गदर्शन करण्यात आले. तहसीलदार नितीन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर स्टाईसचे तज्ज्ञ संचालक नामकर्ण आवारे, महावितरण कंपनीचे अभियंता नीलेश रोहणकर, मंडळ अधिकारी माणिक गाडे, महावितरण कंपनीचे सहायक अभियंता ठुबे, स्टाईलचे व्यवस्थापक कमलाकर पोटे, सरपंच सविता पोटे, स्टाईसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड काढण्यासाठी येणाºया अडचणींबाबत नामकर्ण आवारे यांनी माहिती दिली. कुंदेवाडी गावातील १०० टक्के आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, नवीन रेशनकार्ड, विभक्त रेशनकार्ड देण्यासाठी प्रशासन बांधील असल्याचे तहसीलदार गवळी यांनी सांगितले. शासनाच्या वतीने कुंदेवाडी गावातील
निराधार लोकांसाठी शिबिर आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सौभाग्य योजना, सहज बिजली हर घर बिजली योजनेअंतर्गत येत्या तीन वर्षांत चार कोटी कुटुंबांना वीज कनेक्शन देण्याचा संकल्प बजेटमध्ये मांडलेला असून, गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अभियंता रोहणकर यांनी केले. त्याचप्रमाणे कुसुम योजनेअंतर्गत कृषी ऊर्जा संजीवनीचा फायदा शेतकºयांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात सुमारे ५८ आदिवासी लोकांना जात प्रमाणपत्र व मोफत वीज कनेक्शन अंतर्गत वीज मीटर वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर गोळेसर, संदीप माळी, अनिल दोडके, हिराबाई जाधव आदी उपस्थित होते. शिवराम माळी यांनी सूत्रसंचालन केले. कमलाकर पोटे यांनी आभार मानले.