विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:46 PM2020-01-17T22:46:52+5:302020-01-18T01:12:25+5:30
सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथील मविप्रच्या कै. पुंडलिक कथले विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
वावी : सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथील मविप्रच्या कै. पुंडलिक कथले विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्यात तहसीलदार राहुल कोताडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मिठसागरे येथे पी. बी. कथले विद्यालयात आठवी ते दहवीच्या विद्यार्थ्यांना वय, अधिवास, राष्ट्रीयत्व, डोंगरी, उत्पन्न आशा विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशाच्या वेळेस गैरसोय होऊ नये या उद्देशाने शासनाने विद्यालयात विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यासाठी शिबिर आयोजित केले. या शिबिरात १०२ दाखल्यांचे वाटप झाले करण्यात आले. पंचायत समिती सदस्य योगीता कांदळकर, शालेय समिती अध्यक्ष भगीरथ चतुर, सरपंच वसंत कासार, उपसरपंच भगवान चतुर, पोलीसपाटील राजेंद्र कासार, माजी सरपंच अॅड. शरद चतुर, श्यामराव कासार, मुख्याध्यक नवले, भानुदास भेंडाळे यांच्याहस्ते करण्यात आले. मुख्याधापक नवले यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणाºया कागदपत्रांची जाणीव करून दिली. यावेळी वाल्मीक कासार, सुनील चतुर, जगदीश वाघ, बाळासाहेब साळुंके, दादा पाटील कासार, राहुल वाघ पालक व विद्यार्थी उपस्थित होते. वावी महा ई-सेवा केंद्र संचालक बद्रिनाथ खर्डे यांनी महाराजस्व अभियानाबद्दल माहिती दिली व दाखल्यांचे शैक्षणिककामी असणारे महत्त्व पटवून दिले. शैक्षणिक प्रवेशाच्या वेळेस विद्यार्थ्यांची व पालकांची धावपळ होऊ नये याकरिता आजच आपल्या महाविद्यालयात संपर्क साधून आपल्या पाल्यांची शैक्षणिककामी लागणाºया कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.