महाराजस्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना दाखले वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 05:51 PM2019-12-19T17:51:51+5:302019-12-19T17:53:26+5:30
विल्होळी : येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान प्रकल्पा अंतर्गत विविध प्रकारचे दाखले वाटपाचा शुभारंभ विल्होळी गावच्या (ता. नाशिक) माध्यमिक विद्यालयातून करण्यात आला.
विल्होळी : येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान प्रकल्पा अंतर्गत विविध प्रकारचे दाखले वाटपाचा शुभारंभ विल्होळी गावच्या (ता. नाशिक) माध्यमिक विद्यालयातून करण्यात आला.
या दाखले वाटप शुभारंभप्रसंगी नाशिक तहसीलदार अनिल दोंडे, पाथर्डी मंडलाधिकारी गणेश लिलके, विल्होळी सरपंच बाजीराव गायकवाड, जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष वाळू नवले, विद्यालयाचे मुख्याध्यापक नारायण सूर्यवंशी, पोलीस पाटील संजय चव्हाण, विल्होळी तलाठी पांडुरंग गोतीशे, बाबुराव रूपवते, बबनराव गायकवाड, भास्कर थोरात, सुरेश भावनाथ, पूजा निंबेकर, नारायण जाचक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
तहसीलदार अनिल धोंडे यांनी दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाने ‘महाराजस्व’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना कमीत कमी कागदपत्रांमध्ये दाखले शाळेतच तयार करून वाटप करण्यात आले.
कार्यक्र म यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आभार अहिरे यांनी मानले.