आरोग्य यंत्रणेला कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:30 AM2020-12-16T04:30:52+5:302020-12-16T04:30:52+5:30

कोरोनाच्या संकटातून लवकरात लवकर बाहेर येण्यासाठी सगळेच आपापल्या परीने हातभार लावत आहेत. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी थेट कोरोना रुग्णांच्या ...

Distribution of Corona Prevention Kits to the Health System | आरोग्य यंत्रणेला कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटप

आरोग्य यंत्रणेला कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटप

Next

कोरोनाच्या संकटातून लवकरात लवकर बाहेर येण्यासाठी सगळेच आपापल्या परीने हातभार लावत आहेत. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी थेट कोरोना रुग्णांच्या सहवासात असतात. त्यातील एका जरी वैद्यकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली तर त्या रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना याचा धोका होऊ शकतो. त्यांना प्रतिबंधात्मक किट्सची आवश्यकता असल्याने निमा व आयएफसी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शासकीय रुग्णालयाला प्रतिबंधात्मक किट्सचे वाटप करण्यात आले. या वेळी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. रत्ना रावखंडे, डॉ. आनंद पवार,डॉ. सैंदाणे, वैद्यकीय कर्मचारी श्यामा माहोलीकर यांच्याकडे किट सुपूर्द करण्यात आले. यावेळी निमाचे सरचिटणीस तुषार चव्हाण, श्रीपाद कुलकर्णी, जयंत पवार, बाळासाहेब गुंजाळ, कैलास वराडे, संजय महाजन, सोनाली देवरे आदी उपस्थित होते.

चौकट===

जिल्हा परिषदेला ६० किट्स

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ६० मेडिकल किटबरोबर थर्मामीटर गन, पल्स, ऑक्सिमीटर देण्यात आले. त्याच बरोबर दोन गॉगल, मास्क, २५ डिस्पोजल मास्क, सॅनिटायझर बॉटलचाही त्यात समावेश आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य अधिकारी कपिल आहेर यांच्याकडे या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या. (फोटो १५ झेडपी)

Web Title: Distribution of Corona Prevention Kits to the Health System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.