मालेगावी फडणवीसांकडून प्रशासनावर कौतुकाची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 09:15 PM2020-07-08T21:15:24+5:302020-07-09T00:32:32+5:30
मालेगाव : मालेगावात गत वर्षाच्या तुलनेत चारपट मृत्यू कोरानामुळे झाले. शहरातील कोरोना नियंत्रणात आला असला तरी टेस्टिंग वाढविणे गरजेचे आहे, असे राज्याचेमाजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मालेगाव : मालेगावात गत वर्षाच्या तुलनेत चारपट मृत्यू कोरानामुळे झाले. शहरातील कोरोना नियंत्रणात आला असला तरी टेस्टिंग वाढविणे गरजेचे आहे, असे राज्याचेमाजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
येथील मसगा महाविद्यालयात कोरोनाबाधित रुग्णांची पाहणी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी फडणवीस आले होते. फडणवीस यांनी कोरोनाबाधित रुग्ण ठेवलेल्या कक्षांची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी महापालिका, पोलीस प्रशासनाचे कौतुक करून फडणवीस म्हणाले, मालेगावातील डॉक्टर, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी विशेष मेहनत घेतली. त्यांनी एकमेकात समन्वय घडवून आणला. प्रारंभी मोठी विदारक परिस्थिती होती. त्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता होती. विपरीत परिस्थितीत कर्मचाºयांनी काम केले. सामाजिक संस्थांनी मदत केली. भारतीय जैन संघटनेने ११ रुग्णवाहिका दिल्या. सर्वच पक्षांनी मेहनत घेतल्याने परिस्थिती आटोक्यात आली. प्रारंभी कोरोनाने मृत्यू होऊनही ‘नॉन कोरोना’ दाखविण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची टेस्ट केली जात नव्हती, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. शासन प्रशासन कोरोना विरुद्ध उभे असून, त्यात सर्वांच्या प्रयत्नातून निश्चित यश मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी भारती पवार, प्रवीण दरेकर, जयकुमार रावल, गिरीश महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे आदी उपस्थित होते.