येवला तालुक्यात २५ कोटी ६२ लाखांचे पीक कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:42 PM2020-07-09T17:42:28+5:302020-07-09T17:43:00+5:30
येवला : सहकार विभागाने सुलभ पीक कर्ज अभियान हाती घेतले असून तालुक्यातील १ हजार ७७४ शेतर्कयांना २५ कोटी ६२ लाखांचे कर्ज वाटप झाले आहे.
येवला : सहकार विभागाने सुलभ पीक कर्ज अभियान हाती घेतले असून तालुक्यातील १ हजार ७७४ शेतर्कयांना २५ कोटी ६२ लाखांचे कर्ज वाटप झाले आहे.
तालुक्यात खरीप पीककर्ज वाटपासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार सुलभ कर्ज वाटप अभियान राबविण्यासाठी उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांनी जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिर्कायांची आढावा बैठक घेतली होती. यावेळी कर्जवाटपाचा इष्टांक पूर्ण करत कोणताही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना प्रांताधिकारी कासार यांनी केली होती. तालुक्यात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दहा शाखांमधून ८२६ शेतर्कयांना आठ कोटी ६९ लाखांचे, बँक आॅफ महाराष्ट्राच्या ४ शाखांमधून ३९१ शेतर्कयांना सात कोटी आठ लाखांचे तर स्टेट बँकेच्या वतीने ५१ शेतर्कयांना ८० लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँक आॅफ बडोदाने आपल्या चार शाखांतून ३४२ शेतर्कयांना ६ कोटी ७३ लाखांचे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ९ शेतर्कयांना ११ लाख, बँक आॅफ इंडियाने ४१ शेतर्कयांना ४५ लाख, एचडीएफसी बँकेने २९ शेतर्कयांना ३५ लाख, आयसीसीआय बँकेने ५ शेतर्कयांना १२ लाख तर देना बँकेने ८० शेतर्कयांना १ कोटी २६ लाखांचे कर्ज वाटप आतापर्यंत केले आहे.