धामणगावच्या ग्रामस्थांना डस्टबीनचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 03:21 PM2020-02-28T15:21:35+5:302020-02-28T15:21:45+5:30
सामाजिक पुढाकार गुरू मॉ आनंद आश्रमाचा उपक्रम
घोटी : गावात ग्रामस्थांनी स्वच्छतेचा वसा घेऊन आपले आणि गावाचे आरोग्य निरोगी ठेवावे यासाठी इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे गुरू मॉ आनंद आश्रमाच्यावतीने ग्रामस्थांना दोन हजार डस्टबीनचे वाटप करण्यात आले. आश्रमाचे व्यवस्थापक गुप्ता तसेच सरपंच तुकाराम कोंडुळे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.
इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील गुरू मॉ आनंद आश्रमाने एक वेगळाच आदर्श तालुक्यातील इतर गावांसमोर ठेवत तब्बल दोन हजार डस्टबीनचे वाटप केले आहे . डस्टबीन वाटप केल्याबद्दल धामणगाव ग्रामस्थांच्या वतीने आश्रमाचे व्यवस्थापक गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला. असाच उपक्र म तालुक्यातील इतर संस्था, तसेच ग्रामपंचायतीने राबवावा. यामुळे गावातील अस्वच्छता निर्मूलन होण्यास हातभार लागेल, असे यावेळी गुप्ता यांनी सांगितले. डस्टबीन वाटप कार्यक्र माप्रसंगी उपसरपंच उत्तम गाढवे, शिवाजी गाढवे, सदस्य संपत नवाळे, सोनाली भोईर, सोमनाथ पेढेकर, कविता गाढवे, भाऊसाहेब गाढवे, रु पाली बोराडे, सिताराम मनोहर, चंद्रभागा बरतड, बबाबाई ढवळे, अर्चना गोडे, सविता गाढवे, पार्वताबाई पेढेकर, ज्ञानेश्वर कोंडुळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
एक पाऊल पुढे
स्वच्छतेतून उज्ज्वलता मिळून आरोग्यदायी पिढी निर्माण होईल. स्वच्छ भारत अभियानाच्या पुर्णत्वासाठी कुणाचेतरी योगदान महत्त्वाचे असते. याच भूमिकेतून गुरु मॉ आनंद आश्रमाने एक पाऊल पुढे टाकत गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक डस्टबीन वाटप केले.
- गुप्ता, व्यवस्थापक, गुरू मॉ आनंद आश्रम