दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:45 AM2017-10-31T00:45:50+5:302017-10-31T00:45:56+5:30

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय दृष्टिबाधितार्थ संस्थान नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नॅब संकुल सभागृहात राज्यभरातील उच्च शिक्षण घेणाºया दोनशे दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना अभ्यासकाच्या दृष्टीने अत्याधुनिक शैक्षणिक सामग्री प्लेक्स टॉक वाचन मशिनरीचे वाटप करण्यात आले.

 Distribution of education material to visually impaired students | दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्याचे वाटप

दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्याचे वाटप

Next

नाशिक : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय दृष्टिबाधितार्थ संस्थान नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नॅब संकुल सभागृहात राज्यभरातील उच्च शिक्षण घेणाºया दोनशे दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना अभ्यासकाच्या दृष्टीने अत्याधुनिक शैक्षणिक सामग्री प्लेक्स टॉक वाचन मशिनरीचे वाटप करण्यात आले.  नॅब संकुलाच्या सभागृहात आयकर विभागाचे मुख्य आयुक्त राजेश कुंदन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सदर यंत्रसामग्रीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री होते. व्यासपीठावर आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त लाला जोसेफ नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मानद महासचिव गोपी मयूर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, मंगला कलंत्री, संजीवनी वंडेकर आदी उपस्थित होते.  यावेळी कुंदन म्हणाले की, दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना प्लेक्स टॉक वाचन ही शिक्षण घेण्यासाठी साहाय्यभूत ठरणारी मशिनरी असून, त्यामुळे त्यांचा जीवनात उत्कर्ष होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम वाडेकर यांनी केले. कार्यक्रमास विनोद जाधव, रत्नाकर गायकवाड, वर्षा चकोर, शरद नागपुरे आदी उपस्थित होते.

Web Title:  Distribution of education material to visually impaired students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.