चिंचलेखैरेत शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 06:30 PM2019-07-09T18:30:42+5:302019-07-09T18:31:12+5:30

इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील चिंचले खैरे जिल्हा परिषद शाळेत मुबंई येथील पारिजात फाऊंडेशन यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

Distribution of educational material in Chinchalkarera | चिंचलेखैरेत शैक्षणिक साहित्य वाटप

इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे शाळेत पारजिात संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप करतांना मान्यवर आदी.

Next

इगतपुरी: तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील चिंचले खैरे जिल्हा परिषद शाळेत मुबंई येथील पारिजात फाऊंडेशन यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी परिजात फाऊंडेशनचे सदस्य तुषार कोठारी ,कौर ,शिरोडकर , सरपंच मंगाजी भाऊ खडके ,सदस्य भाऊ भुरबुडे माजी उपसरपंच निवृत्ती खोडके ,गोविंद तळपाडे ,संजय भोईर, शिक्षक नामदेव धादवड , प्रशांत बाबळे ,हौशीराम भगत,भाग्यश्री जोशी,मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
आदिवासी भागातील मुलांनी शिक्षणा पासुन वंचित न राहाता उच्चशिक्षित व्हावे व गावा बरोबर देशाचे नाव लौकिक करावे हा पारजिात फाऊंडेशन संस्थेचा उद्देश आहे असे तुषार कोठारी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

Web Title: Distribution of educational material in Chinchalkarera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.