एकलव्य पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:42 AM2019-07-29T00:42:41+5:302019-07-29T00:43:04+5:30
शिक्षण क्षेत्रामध्ये पैसा, श्रेयवाद आणि राजकारण या गोष्टी द्रोणाचार्य आहेत, तर जे शिक्षण बाजारीकरणाच्या विरोधात काम करीत आहेत, ते सारे एकलव्य आहेत. शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी केले.
नाशिक : शिक्षण क्षेत्रामध्ये पैसा, श्रेयवाद आणि राजकारण या गोष्टी द्रोणाचार्य आहेत, तर जे शिक्षण बाजारीकरणाच्या विरोधात काम करीत आहेत, ते सारे एकलव्य आहेत. शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी केले.
प़सा़ नाट्यगृहात मानव अधिकार संवर्धन संघटन आयोजित एकलव्य गौरव पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, माजी विद्यार्थ्यांनी, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी प्रशासकीय शाळा, मराठी शाळा यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी काम केले पाहिजे. संस्थेचे अध्यक्ष शांताराम चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले़ यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकलव्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यानंतर बी.डी. भालेकर विद्यालय, सारडा कन्या विद्यालय, नॅशनल उर्दू हायस्कूल यांसारख्या विविध शाळांमधून निवडल्या गेलेल्या एकूण १५० विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला. यावेळी मंचावर श्रीधर देशपांडे, मुकुंद दीक्षित, श्यामला चव्हाण, डॉ. मिलिंद वाघ आदी उपस्थित होते.
गुणवत्ता शिक्षणाचा अधिकार
मातृभाषेतून शिक्षण घेण्यासह गुणवत्तापूर्ण शिक्षणाचादेखील अधिकार विद्यार्थ्यांना आहे. त्यासाठी एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे आहे. आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगले शिक्षण या ठिकाणापर्यंत पोहोचण्याची पायरी ठरते. त्यामुळे शिक्षणाचा पाया उत्तम आणि योग्य असणे महत्त्वाचे आहे, असे मोहीते यांनी यावेळी नमूद केले.