जीवनावश्यक वस्तूंचे ठाणगावी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:10 AM2021-06-10T04:10:55+5:302021-06-10T04:10:55+5:30

------ बारावी परीक्षा शुक्ल परत देण्याची मागणी सिन्नर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Distribution of essential commodities | जीवनावश्यक वस्तूंचे ठाणगावी वाटप

जीवनावश्यक वस्तूंचे ठाणगावी वाटप

Next

------

बारावी परीक्षा शुक्ल परत देण्याची मागणी

सिन्नर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क त्यांना परत करावे, अशी मागणी प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष सूरज सानप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे.

------------------------

पाटोळेत १०० वृक्षांचे रोपण

सिन्नर : पाटोळे येथे रोटरी क्लब ऑफ सिन्नर सिटी व रामकृष्ण हरी बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते जोगेश्वरी देवी गड रस्त्याच्या दुतर्फा जवळपास १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. संस्थेतर्फे वृक्षांचे संगोपन करण्यात येणार आहे. यामध्ये अर्जुन, सादडा, कडुनिंब, पिंपळ, वड, चिंच, कौठ, बेल आदी झाडांचा समावेश होता. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय गायकवाड, सचिव निशांत लढ्ढा, प्रकल्पप्रमुख रवींद्र खताळे, चैतन्य कासार, मनोज गुंजाळ, संजय आव्हाड, नाना भगत, चंद्रशेखर बर्वे आदींसह रामकृष्ण हरी संस्था व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Distribution of essential commodities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.