ठाणापाड्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 06:54 PM2021-05-30T18:54:31+5:302021-05-31T00:41:14+5:30
वेळुंजे : आपण समाजाचे काही देणे लागतो हा उदात्त हेतू ठेवत नाशिकच्या दान फाउंडेशनने ठाणापाडा येथील २६१ गरजूंना कपडे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
वेळुंजे : आपण समाजाचे काही देणे लागतो हा उदात्त हेतू ठेवत नाशिकच्या दान फाउंडेशनने ठाणापाडा येथील २६१ गरजूंना कपडे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
ठाणापाडा (ता.त्र्यंबकेश्वर) येथे नाशिकच्या दान फाउंडेशनने माकपचे जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या पुढाकारातून २६१ गरजूंना कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तहसीलदार दीपक गिरासे, शेख, जिल्हा परिषद सदस्य रमेश बरफ, पंचायत समिती उपसभापती देवराम मौळे, माजी सभापती ज्योती राऊत, सरपंच महेंद्र पवार, महसूल मंडळ अधिकारी एच.जी. कुलकर्णी, दान फाउंडेशनचे मधुकर शर्मा, नीलेश शर्मा, मीना शर्मा, ग्रंथ शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यात साड्या, लहान मुलांना कपडे, स्कार्प, सॅनिटायझर, मास्क आदींसह जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. यावेळी भाऊराज राथड, पंडित गावीत, गणपत गावीत, रमेश वार्डे, अंबादास फसाळे, प्रवीण बरफ, चंदर चौधरी आदींसह तलाठी, ग्रामस्थ, लाभार्थी उपस्थित होते.
कोरोनाकाळात दान फाउंडेशनने ग्रामीण भागात केलेली मदत प्रेरणादायी तसेच कौतुकास्पद आहे. २६१ गरजूंच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करून मनोबल वाढविले आहे.
- इरफान शेख, जिल्हा सेक्रेटरी, माकप.