आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 10:26 PM2020-04-24T22:26:36+5:302020-04-24T23:45:34+5:30
नांदूरवैद्य: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदुलीपाडा या आदिवासी कुटुंबात शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान बोडके यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
नांदूरवैद्य: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हेदुलीपाडा या आदिवासी कुटुंबात त्र्यंबकेश्वर शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान बोडके यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत सरपंच नानासाहेब उघडे व ग्राम अधिकारी योगीता पुंड यांच्या प्रमुख उपस्थितीत तेथील आदिवासी कुटुंबातील नागरिकांना या वस्तूंचे वाटप केले. ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक बांधिलकी उपक्र माअंतर्गत आपणही समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने अतिशय दुर्गम भागात असलेल्या हेदुलीपाडा येथील विधवा, कष्टकरी मजूर, निराधार कुटुंबांतील व्यक्ती, अपंग आदीं नागरिकांपर्यंत मदत पोहोचत नसल्यामुळे साखर, तांदूळ, साबण, चहापावडर, तेल आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.