ठेंगोडा येथील शेतकऱ्यांना खते, बियाणे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:04 PM2020-05-24T22:04:46+5:302020-05-24T22:05:29+5:30

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकºयांची खते व बियाणे खरेदीसाठी दुकानात गर्दी होऊ नये यासाठी देवळा तालुक्यातील शेतकºयांच्या गटाची नोंदणी करून शेतकºयांच्या बांधांवर खते व बियाणे पोहच करण्याचा उपक्र म कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

Distribution of fertilizers and seeds to farmers in Thengoda | ठेंगोडा येथील शेतकऱ्यांना खते, बियाणे वाटप

लोहोणेर येथे शेतकऱ्यांना खते वाटप करताना उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे. समवेत एस. एस. पवार, चव्हाण, गायकवाड, वैशाली पवार आदी.

Next

लोहोणेर : देवळा तालुक्यातील सावकी व बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील शेतकºयांच्या बांधांवर जाऊन खते व बियाणांचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकºयांची खते व बियाणे खरेदीसाठी दुकानात गर्दी होऊ नये यासाठी देवळा तालुक्यातील शेतकºयांच्या गटाची नोंदणी करून शेतकºयांच्या बांधांवर खते व बियाणे पोहच करण्याचा उपक्र म कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
सावकी व ठेंगोडा येथे मालेगावचे उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांच्या हस्ते शेतकºयांना खते व बियाणे वाटप करण्यात आली. यावेळी सटाण्याचा तालुका कृषी अधिकारी एस. एस. पवार, कृषी पर्यवेक्षक चव्हाण, कृषी सहायक गायकवाड, लोहोणेरच्या कृषी सहायक वैशाली पवार, बी. टी. एम. आत्मा देवळा महेश देवरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपविभागोय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी पेरणीपूर्वीची मशागत बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी बीजप्रक्रिया, खतांचा वापर याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन केले. यावेळी केदा निकम, बाळू निकम, सुरेश निकम, किशोर शिवले, किरण निकम, अनिल शिवले, विजय पाटील, दिलीप पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Distribution of fertilizers and seeds to farmers in Thengoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.