चांदवड प्रांत कार्यालयात उत्तर महाराष्टÑातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 05:46 PM2018-12-14T17:46:18+5:302018-12-14T17:46:35+5:30

चांदवड - बहुप्रतिक्षीत मराठा आरक्षण अखेर झाले असून आगामी काळात निघणाऱ्या शासकीय सेवेतील पदांसाठी ते लागू करण्यात आले आहे. या पाशर््वभूमीवर मराठा जात प्रमाणपत्राचे वाटप महसुल विभागाकडून सूरु करण्यात आले असून उत्तर महाराष्ट्रातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

Distribution of the first Maratha caste certificates of North Maharashtra in the Chandwad Province office | चांदवड प्रांत कार्यालयात उत्तर महाराष्टÑातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र वाटप

चांदवड प्रांत कार्यालयात उत्तर महाराष्टÑातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र वाटप

googlenewsNext

चांदवड - बहुप्रतिक्षीत मराठा आरक्षण अखेर झाले असून आगामी काळात निघणाऱ्या शासकीय सेवेतील पदांसाठी ते लागू करण्यात आले आहे. या पाशर््वभूमीवर मराठा जात प्रमाणपत्राचे वाटप महसुल विभागाकडून सूरु करण्यात आले असून उत्तर महाराष्ट्रातील पहिले मराठा जात प्रमाणपत्र प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.आगामी काळात महाराष्ट्र शासन ७२ हजार शासकीय पद भरण्याच्या तयारीत असून यातील पहिल्या टप्यातील ३६ हजार पदे भरण्यात येणार आहे. यासाठी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू करण्यात आल्याने आगामी काळात मराठा तरु णांची धावपळ होणार आहे याच पाशर््वभूमीवर प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या मार्फत दहा मराठा तरु णांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.दरम्यान राज्यातील पहिलं मराठा जात प्रमाणपत्र मराठवाड्यातुन वितरित केलं आहे यानंतर उत्तर महाराष्ट्रातुन पहिलं मराठा जात प्रमाणपत्र हे चांदवड प्रांत कार्यालया अंतर्गत वाटप करण्यात आले आहे.
यामुळे प्रमाणपत्र लाभार्थी विद्यार्थ्यांनी शासनासोबत चांदवड प्रांत कार्यालयाचे आभार मानले.यावेळी प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, नायब तहसीलदार एस. पी. भादेकर, नायब तहसिलदार मीनाक्षी गोसावी, डी. यु. राखूडे, ए. डी. मेदडे, जे. एम. गायकवाड, एम. के. नाईक, गोराने, संदीप गांगुर्डे यांच्यासह मराठा जात प्रमाणपत्र लाभार्थी सुवर्णा शेळके, कृष्णा गांगुर्डे, योगेश शिंदे, गणेश पवार, तृप्ती शेळके, अजय शेळके, सुमित शेळके, नितीन ठाकरे, प्रियंका शिंदे, बापू ठाकरे, मनोहर चव्हाण, कैलास चव्हाण, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of the first Maratha caste certificates of North Maharashtra in the Chandwad Province office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.