बोरीचीबारी येथे फुले नाचणी बियाणे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:59+5:302021-06-09T04:16:59+5:30
पेठ : कोरोना काळात उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या व लोह, कॅल्शियम, प्रथिने, तंतुमय जीवनसत्वे, खनिज अशा शरीरास पाैष्टिक ...
पेठ : कोरोना काळात उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या व लोह, कॅल्शियम, प्रथिने, तंतुमय जीवनसत्वे, खनिज अशा शरीरास पाैष्टिक असलेल्या फुले नाचणी या नवीन बियाणाचे बोरीचीबारी येथील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
पेठ तालुक्यात ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून नागली पिकावर प्रकल्प राबविण्यात येत आहे. नामशेष होत चाललेल्या नागली या पिकांचे क्षेत्रात वाढ होऊन नागली पासून बिस्कीट, पापड, पेज, भरडा, चिकी इ. पदार्थ तयार करता येतील या उद्देशाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकरी गटाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले नाचणी या वाणाचे बियाणाचे तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. बोरीचीबारी येथील २० लाभार्थी निवड करुन प्रती एक किलो बियाणे ब्रीडर सीड देण्यात आले. यामुळे नागली ग्रामबीजोत्पादन होणार असून इतर शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
-------------------------
नैसर्गिक बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक खरिपाच्या उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने तालुक्यात बीजप्रक्रिया अभियान राबवण्यात येत असून बोरीचीबारी येथे महिला शेतकऱ्यांना नागली या बियाणावर बीजप्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. यावेळी स्थानिक महिला शेतकऱ्यांनी स्वतः घरातील बियाणावर प्रक्रिया करून दाखवली. यामुळे बियाणाची प्रत ठरवली जात असल्याने उत्पादनात वाढ होणार असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.
---------------------
बोरीचीबारी येथे आत्मा प्रकल्पांतर्गत नागली बियाणे वाटप करताना तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे व शेतकरी. (०८ पेठ १)
===Photopath===
080621\08nsk_6_08062021_13.jpg
===Caption===
०८ पेठ १