जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी येथे 50 विद्यार्थ्यांना एफ एम वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 09:16 PM2020-10-22T21:16:00+5:302020-10-23T00:09:47+5:30
ओझरटाऊनशिप : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी( ओझर) येथे 50 गरीब विद्यार्थ्यांना ओझर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्यातर्फे रेडिओ एफ एम चे वाटप करण्यात आले.
ओझरटाऊनशिप : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी( ओझर) येथे 50 गरीब विद्यार्थ्यांना ओझर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्यातर्फे रेडिओ एफ एम चे वाटप करण्यात आले.
शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्या प्रेरणेने जिल्हाभर एफ एम रेडिओ वाटप असे उपक्रम चालू आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून काल बुधवार रोजी निफाड तालुक्यातील ओझर केंद्रातील सर्व शिक्षकव्रुंद यांनी गरीब विद्यार्थ्यांना एफ एम रेडीओ चे चे वाटप केले. या एफ एम रेडीओ वर अनेक प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना ऐकायला मिळावेत व त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शिक्षकांनी हा आगळावेगळा उपक्रम घडवून आणला.
निफाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप कराड व निफाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांनी निफाड तालुक्यात एफ एम रेडिओ वाटप करण्याचे आवाहन केले होते. या आवाहानास प्रतिसाद देत ओझर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी स्वखर्चातून एकूण पन्नास विद्यार्थ्यांना एफ एम रेडीओ चे वाटप केले. हा कार्यक्रम बुधवार दिनांक 21 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी ओझर येथे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ओझर मुले शाळेतील शिक्षिका श्रीमती योगेश्वरी सोनवणे यांनी एफ एम रेडीओ वर कोणत्या प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम दाखवले जातात याची माहिती दिली. एफ एम रेडीओ चे प्रात्यक्षिक श्रीमती बिरारी यांनी करून दाखविले. एफ एम रेडिओ मिळाल्यामुळे परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना व पालकांना खूप आनंद झाला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.यावेळी वंदना धरमखेले यांनी स्वखर्चातून एका गरीब विद्यार्थ्यांला एक मोबाईल डोनेट केला.