लाडूद येथे लाभार्थ्यांना खावटी वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:17 AM2021-09-14T04:17:39+5:302021-09-14T04:17:39+5:30

याप्रसंगी आदिवासी विकास महामंडळाचे उपव्यवस्थापक श्रीमती मोरे, तसेच सोमपूरच्या सरपंच गायकवाड, तांदूळवाडीचे सरपंच प्रकाश बोरसे, वाडीपिसोळचे सरपंच उपस्थित ...

Distribution of food items to the beneficiaries at Ladud | लाडूद येथे लाभार्थ्यांना खावटी वस्तूंचे वाटप

लाडूद येथे लाभार्थ्यांना खावटी वस्तूंचे वाटप

Next

याप्रसंगी आदिवासी विकास महामंडळाचे उपव्यवस्थापक श्रीमती मोरे, तसेच सोमपूरच्या सरपंच गायकवाड, तांदूळवाडीचे सरपंच प्रकाश बोरसे, वाडीपिसोळचे सरपंच उपस्थित होते. यावेळी आमदार बोरसे म्हणाले की, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर वेळोवेळी विविध योजना राबविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. खावटी योजना त्याचाच एक भाग आहे. अजूनही कोणी या योजनेपासून वंचित राहिले असेल त्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून अर्ज भरावेत, असे आवाहन केले. आदिवासी बांधवांनी आरोग्याच्या बाबतीत जागरूक असले पाहिजे. कोरोनासारख्या जीव घेण्या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी गैरसमज दूर करून लसीकरण करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविकात श्रीमती मोरे म्हणाल्या, शासनस्तरावरून असलेल्या अटी संदर्भात ज्या त्या लाभार्थ्यांचे आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन झाले असतील त्यांना लाभ जरूर मिळेल व अजूनही योग्य ते कागदपत्रे दिल्यास कार्यवाही पूर्ण होऊ शकते. परिसरातील सोमपूर, तांदळवाडी, भडाणे व लाडूद येथील लाभार्थ्यांना योग्य त्या कागदपत्रांची तपासणी करून वस्तूंचे वाटप करण्यात आले.

फोटो - १०लाडूद१ लाडूद येथे लाभार्थ्यांना खावटी वस्तूंचे वाटप करताना आमदार दिलीप बोरसे. समवेत आदिवासी विभागाच्या मोरे.

100921\454410nsk_32_10092021_13.jpg

लाडूद येथे लाभार्थ्यांना खावटी वस्तूंचे वाटप करताना आमदार दिलीप बोरसे. समवेत आदिवासी विभागाच्या मोरे.

Web Title: Distribution of food items to the beneficiaries at Ladud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.