भूमिहीन कुटुंबीयांना धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:14 AM2021-05-18T04:14:54+5:302021-05-18T04:14:54+5:30
सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथे ४० भूमिहीन कुटुंबीयांना धान्य वाटप करण्यात आले. भोकणीत २१ एप्रिल ते ५ मेपर्यंत जनता ...
सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथे ४० भूमिहीन कुटुंबीयांना धान्य वाटप करण्यात आले.
भोकणीत २१ एप्रिल ते ५ मेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्याने हळूहळू कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे गावातील अनेक नागरिकांचे कामधंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत ग्रामस्थांनी सरपंच सरपंच अरुण वाघ यांच्याकडे व्यथा मांडल्या. लॉकडाऊनमुळे होणारे नागरिकांचे हाल व समस्या बघता त्यांनी भूमिहीन कुटुंबांना स्व-खर्चातून धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला. ग्रामविकास मंचचे सदस्य संपत ओहळ यासाठी गाडी उपलब्ध करून दिली. ग्रामविकास मंचच्या सदस्यांनी धान्य वाटपास मदत केली. गरजूंना प्रत्येकी १५ किलो बाजरी व सात किलो तांदूळ वाटप करण्यात आले. यावेळी भागीनाथ कुर्हाडे, संपत ओहळ, शरद साबळे, उदय सानप, अक्षय गोसावी, विकास ननावरे, दिलीप सोनवणे, महेश कुर्हाडे आदी उपस्थित होते.