गरजू विद्यार्थ्यांना धान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 11:07 PM2020-04-24T23:07:30+5:302020-04-24T23:42:42+5:30
नाशिक : गेल्या शतकभरापासून नाशिक जिल्ह्यात शिक्षणाचे कार्य करीत असलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेने स्वातंत्रपूर्व काळापासून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. कोरोना संकटाच्या काळात हीच परंपरा कायम राखत संस्थेच्या नाशिक येथील रुंग्टा हायस्कूल व पुष्पावती रुंग्टा हायस्कूल, तर नाशिकरोड येथील पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल या तीन शाळांकडून जवळपास तीनशे गरीब विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अन्नधान्य व किराणा मालाचे वाटप करण्यात आले.

जगावर कोविड- १९ हे संकट आले आहे. देशात लॉकडाउन व संचारबंदी असल्याने सर्व व्यवहार बंद आहेत. या काळात अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे. हातावर काम करणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्यांना काम नसल्याने कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. ही संकटाची परिस्थिती लक्षात घेत संस्थेचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर, कार्यकारी मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल, सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी संस्थेच्या विविध शाळांतील गरीब विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना अन्नधान्य व किराणा वाटपाचा निर्णय घेतला. त्यानुसार
फुलेनगर, क्रांतीनगर, रामवाडी, हनुमानवाडी, मोरे मळा, लोणार गल्ली, रविवार कारंजा, मल्हारखाण, अशोकस्तंभ, कुंभारवाडा, गंजमाळ व नाशिकरोड परिसरातील गरजू विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मदत पोहोचवण्यात आली.
---------
जीवनावश्यक वस्तूंची गरीब विद्यार्थ्यांना भेट
नाशिकरोड येथील संस्थेच्या पुरुषोत्तम इंग्लिश हायस्कूल, नाशिकच्या
जु. स. रुंग्टा हायस्कूल व पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन करीत शाळेतील गरजू विद्यार्थ्यांची यादी तयार केली. या तीनही शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी एकत्रित निधी गोळा केला. यातून तिन्ही शाळांकडून पाच किलो गहू, दोन किलो साखर, एक किलो तूर डाळ, एक किलो गोडे तेल, पावकिलो चहा पावडर व पाव किलोचे तिखट पाकीट आदी जीवनावश्यक साहित्याची पाकिटे तयार करून