कोजागीरी पौर्णिमेनिमित्त मोफत दमा औषध वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 00:22 IST2020-10-31T20:57:03+5:302020-11-01T00:22:58+5:30
येवला : येथील येवला तालुका योग निसर्गोपचार असोसिएशन संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मोफत दमा औषध वाटप शिबीर संपन्न झाले.

कोजागीरी पौर्णिमेनिमित्त मोफत दमा औषध वाटप
येवला : येथील येवला तालुका योग निसर्गोपचार असोसिएशन संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही मोफत दमा औषध वाटप शिबीर संपन्न झाले.
संस्थेच्या वतीने दरवर्षी कोजागीरी पौर्णिमेनिमित्त मोफत दमा औषधाचे वाटप केले जाते. यावर्षीही संस्थेने शहरातील देशपांडे गल्लीत सदर औषध वाटप शिबीर आयोजित केले होते. शिबीरात दमा रूग्णांना डॉ. धर्मराज शिरसाट यांचे हस्ते औषध वाटप केले गेले. यावेळी डॉ. शिरसाठ यांनी रूग्णांना मार्गदर्शनही केले.
शिबीराचा तालुक्यासह नाशिक, इगतपुरी, ओझर, मालेगाव, नांदगाव, सटाणा, बागलाण, सातपूर, विंचूर, निफाड, मनमाड, कोपरगाव आदी गाव परिसरातील स्त्री, पुरुषांनी या औषधाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. हेमंत मोहाडीकर, डॉ. हेमलता शिरसाट, डॉ. योगेंद्र वाघ आदींनी सहकार्य केले.