सावित्रीच्या लेकींना मोफत सायकलींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:32 PM2020-06-22T22:32:19+5:302020-06-22T22:33:36+5:30
कळवण : येथील आर के एम माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीच्या ८१ गरजु विद्यार्थीनींना मानव विकास योजने अंतर्गत मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्यामुळे विद्यार्थीनींची पायपीट व वेळ वाचणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : येथील आर के एम माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीच्या ८१ गरजु विद्यार्थीनींना मानव विकास योजने अंतर्गत मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्यामुळे विद्यार्थीनींची पायपीट व वेळ वाचणार आहे.
कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड शशिकांत पवार, संचालक राजेंद्र भामरे, प्राचार्य एल डी पगार, पर्यवेक्षक जे आर जाधव व एन डी देवरे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.
या योजने अंतर्गत आर के एम माध्यमिक विद्यालयातील ८१ गरजु व गरीब विद्यार्थीनींना सायकली देण्यात आल्या. शक्षणासाठी शाळेत दररोज पाच-सहा किलोमीटरहुन पायपीट करत येणाºया सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या गोरगरीब विद्यार्थीनींना सायकलींची भेट मिळताच त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या चेहर्यावरील हास्य हे आनंद झाल्याची साक्ष देत होते. सायकल भेटल्यामुळे आता विद्यार्थीनींची पायपीट व वेळ वाचणार असुन मानव विकास च्या या उपक्र माचे विद्यार्थीनी व पालकांनी स्वागत केले आहे.
यावेळी आर के एम माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एल डी पगार , पर्यवेक्षक जे आर जाधव, एन डी देवरे ,पी एम महाडीक, सुनिल
पाटोळे, साबळे आदीसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीनी उपस्थित होते.पालकांचाही प्रश्न सूटलामानव विकास मिशन अंतर्गत गरजू मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले असून मुलींना लांब अंतरावरील शाळेत कसं पाठवायचं हा पालकांसमोरील प्रश्न सुटला आहे.सायकल मिळाल्याने मुलींची शाळेतील उपस्थिती देखील वाढणार आहे. शाळेतील ८१ विद्यार्थीनीना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे आर के एम माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एल डी पगार यांनी सांगितले.