पहिलवानांना मोफत खुराकाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 07:45 PM2021-06-02T19:45:56+5:302021-06-03T00:17:16+5:30
सर्वतीर्थ टाकेद : कोरोनाच्या कठीण परिस्थितीत राज्यभरातील अनेक कुस्ती केंद्रातील कुस्तीगीर, मल्ल, कुस्तीपट्टू यांची पुरेशा खुराकाअभावी गैरसोय होत आहे. अनेकांच्या दैनंदिन होत असलेल्या कुस्ती तालमीत खंड पडला. त्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बु. येथील पहिलवान दत्तू गायकर यांनी गुरू हनुमान आखाडा, साकूर फाटा येथील कुस्तीगीर पहिलवानांना खुराक म्हणून काजू, बदाम, खारीक आदी ड्रायफूटचे वाटप केले.

पैलवान दत्तू हौसाजी गायकर यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रभर वस्ताद छबू गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्त्यांचे आखाडे गाजवले आहेत. यासोबतच त्यांची ही परंपरा पहिलवान सचिन गायकर, पहिलवान श्याम गायकर हे चालवत आहेत.
कोरोनासारख्या महामारी रोगामुळे कुस्ती क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. पहिलवानांचा खुराकाचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही दानशूर लोक पुढे येऊन मदत करत आहेत. पहिलवानांना मदतीचा हात म्हणून गायकर यांनी साकूर फाटा परिसरातील गुरू हनुमान आखाडा कुस्ती केंद्रातील कुस्तीगिरांना काजू, बदाम, खारीक, मनुके आदी ड्रायफूटचे वाटप केले. यावेळी वस्ताद रुंजा काळे, ज्ञानेश्वर पागेरे, वंजारवाडी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, तबन गायकर, संदीप गायकर, उत्तर महाराष्ट्र केसरी बाळू बोडके, कैलास जाधव, प्रवीण सूर्यवंशी, अविनाश सहाणे, सचिन गायकर, पहिलवान तसेच विजय गायकर, ऋषीकेश गोडसे, कृष्णा गायकर आदी उपस्थित होते.
कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे. मात्र कुस्तीगीर खेळाडूंची केवळ आर्थिकदृष्ट्या खुराकावाचून गैरसोय होत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कुस्ती केंद्र आखाडे बंद असल्याने अनेकांच्या दैनंदिन तालमीत-कुस्ती सरावात मोठ्या प्रमाणात खंड पडला आहे. किमान दानशूर लोकांनी मातीतली कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी मदतरूपी हात पुढे करावेत.
- दत्तू गायकर, पैलवान, नांदगाव बु.