देवळ्यात मोफत पाठयपुस्तकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 03:05 PM2019-06-17T15:05:34+5:302019-06-17T15:06:32+5:30
देवळा : येथील जिजामाता कन्या विद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी इ. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींना मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
देवळा : येथील जिजामाता कन्या विद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी इ. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींना मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून देवळा ऐज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य हितेंद्र अहेर, सचिव गंगाधर शिरसाठ उपस्थित होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चिंतामण अहेर होते.मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम पाच व एन.एम.एम.एस. परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिचा व त्यांच्या पालकांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. राजमाता जिजाऊ स्मृतिदिन साजरा करण्यात आला. जे.टि.बत्तीसे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी माहिती दिली.यशस्वी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करु न, शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. देवळा ऐज्यूकेशन सोसायटी संचलित, सर्व माध्यमिक शाखांमध्ये जिजामाता कन्या विद्यालयाचा दहावीचा निकाल सर्वांत जास्त लागला आहे. सुत्रसंचलन एस.एन. अहेर यांनी केले. एम. ए. अहेर यांनी आभार मानले. यावेळी मुख्याध्यापिका उषा बच्छाव, पर्यवेक्षिका उषादेवी पाटील यांनी केले.