‘ग्रेपसिटी गौरव’ पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:34 AM2019-09-23T00:34:22+5:302019-09-23T00:34:43+5:30
जेसीआय संस्थेच्या वतीने ‘जेस्सी वीक-२०१९’च्या समारोपप्रसंगी आयोजित सोहळ्यात ग्रेपसिटी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी शहरातील शैक्षणिक, सामाजिक, कला आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान करण्यात आला.
नाशिक : जेसीआय संस्थेच्या वतीने ‘जेस्सी वीक-२०१९’च्या समारोपप्रसंगी आयोजित सोहळ्यात ग्रेपसिटी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी शहरातील शैक्षणिक, सामाजिक, कला आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान करण्यात आला.
जेसीआय ग्रेपसिटी व क्विन्स यांच्या संयुक्त विद्यमाने गंगापूररोडवरील शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात रविवारी (दि.२२) पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नवनाथ येवले उपस्थत होते. त्यांच्यासमवेत प्रफुल्ल पारख, प्रशांत पारख, प्रदीप गिरासे, सुप्रिया जैन, सारिका वाघमारे, वैशाली पारख आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, योगगुरू विश्वासराव मंडलिक, शैक्षणिक क्षेत्रासाठी इस्पॅलियर स्कूलचे संचालक सचिन जोशी, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. तापस कुंडू, कला क्षेत्रात गायक मीना परुळेकर-निकम, लोकमतचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी जैन, पारख यांनी जेसी वीकमध्ये करण्यात आलेली विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा सादर केला.
पुरस्कारार्थी मंडलिक यांनीही आपले मनोगत व्यक्त करत सामाजिक जीवनात योगाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. जोशी यांनी शैक्षणिक व्यवस्थेतील बदलाची गरज याविषयी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. पंकज जैन यांनी केले. सूत्रसंचालन अजय चव्हाण यांनी केले व आभार पराग घारपुरे यांनी मानले. यावेळी जेसीआय ग्रेपसिटीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.