हौसला संस्थेकडून मूकबधिर मुलांना किराणा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:28+5:302021-05-28T04:12:28+5:30
कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार गेले. हाताला काम नसल्याने सामान्य कुटुंबे रस्त्यावर आली. वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या कुटुंबाचे खूप हाल ...
कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार गेले. हाताला काम नसल्याने सामान्य कुटुंबे रस्त्यावर आली. वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या कुटुंबाचे खूप हाल झाले. या पार्श्वभूमीवर हौसला या सामाजिक संस्थेने सदर उपक्रम राबविला. मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयात समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांच्या हस्ते पन्नास गरजू व गरीब मुलांना आपल्या किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात तेल, शेंगदाणे, तांदूळ, आटा, मिरची, मसाला, मीठ, मसूरडाळ, गूळ, हळद, साबण अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
कोकाटे यांनी हौसलाचे हरीश बैजल व जसबीर सिंग यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमास मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे, शिक्षक हेमंत पाटील, सुखदेव आहेर, संतोष कोकाटे, नितीन कदम आदी उपस्थित होते.
फोटो - २७ येवला १
येवला येथे मूकबधिर मुलांना किराणा वाटप करताना समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे.