किराणा, सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 12:01 AM2020-04-06T00:01:19+5:302020-04-06T00:09:10+5:30
संगमेश्वर : मालेगाव येथील मौलाना मुख्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस व अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयातर्फे चंदनपुरी येथील गोंड वस्ती भागात ६०० कुटुंबांना किराणा व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमेश्वर : मालेगाव येथील मौलाना मुख्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस व अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयातर्फे चंदनपुरी येथील गोंड वस्ती भागात ६०० कुटुंबांना किराणा व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
सुमारे १५ दिवस पुरेल इतका किराणा, तांदूळ, तेल, मसाले, कांदे, दाळ, बटाटे, मिरची यांचा किटमध्ये समावेश आहे. सदर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आॅनलाइन पद्धतीने शिकविण्याचे काम सुरू आहे. कोरोना विषाणूसंदर्भात माहिती देण्यासाठी चित्रफितीद्वारे प्रात्यक्षिकेद्वारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. ए. के. कुरैशी यांनी दिली.
जामिया मोहंमदिया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अर्शद मुख्तार, सचिव रशीद मुख्तार व प्राचार्य कुरैशी यांनी कोरोना साथीच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्याकरिता जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
याचाच भाग म्हणून ग्रामीण भागात अडीच हजार लोकांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. त्याशिवाय लॉकडाउनमुळे दिव्यांग, गोरगरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना संस्थेतर्फे मदत केली जात आहे. पाच हजार कुटुंबांना किटचे वाटप केले गेले.
गेल्या दहा दिवसांपासून मनमाड चौफुली येथे दिव्यांग व गरीब लोकांना १०० किलो मसाले भाताचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अर्शद मुख्तार, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, डॉ. ए. के. कुरैशी, डॉ. इरफान, डॉ. मिनाज, डॉ. माजीद आदी उपस्थित होते.