गडावरील ६०० कुटुंबीयांना किराणा किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:19 AM2021-09-16T04:19:13+5:302021-09-16T04:19:13+5:30
कळवण : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने धार्मिक स्थळे, मंदिरे ‘लॉकडाऊन’ केली असल्यामुळे धार्मिक स्थळे, मंदिर यांच्यावर ...
कळवण : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने धार्मिक स्थळे, मंदिरे ‘लॉकडाऊन’ केली असल्यामुळे धार्मिक स्थळे, मंदिर यांच्यावर उपजीविका असलेले हातावरील स्थानिक विक्रेते, दिव्यांग, गरजू, गोरगरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अशा गरजू लोकांच्या मदतीसाठी मुंबईचे उद्योगपती कौशिक भाई, अनिल बांद्रा यांनी गडावरील ६०० कुटुंबीयांना ६०० किराणा किटचे वाटप केले. यावेळी गडावरील ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक जोरावर, शांताराम गवळी, मधुकर गवळी, योगेश कदम आदींनी मदतकार्य केले. उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सप्तश्रृंग निवासिनीच्या गडावरील अर्थचक्र कोरोनामुळे पूर्णतः मंदावले असून, येथील व्यावसायिकांचे जगणे ‘लॉक’ झाले आहे. कोरोनाचे संकट केव्हा दूर होईल आणि देवी भक्तांना दर्शनासाठी मंदिर कधी खुले होईल, याची आस लागली आहे. श्री सप्तशृंग गडावरील भगवती मंदिर शासन निर्देशानुसार बंद असून, देवीच्या भक्तांना पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन नतमस्तक व्हावे लागत आहे. पहिल्या पायरीवर दर्शनासाठी देवी भक्त येत असल्यामुळे थोडेफार आर्थिक चलन सुरु झाले आहे. त्यामुळे कधी एकदाचा कोरोना जाईल आणि आई भगवतीचे दर्शन सुरू होऊन मंदिर सर्वांसाठी खुले होईल आणि भाविकांची वर्दळ सुरू होईल, याकडे येथील व्यावसायिकांचे डोळे लागले आहेत.
---------------------------
सप्तश्रुंगी गडावर मुंबईचे उद्योगपती अनिल बांद्रा यांच्याकडून कुटंबीयांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी दीपक जोरवर व नागरिक उपस्थित होते. (१५ गड १)
150921\15nsk_7_15092021_13.jpg
१५ गड १