अतिदुर्गम पाड्यातील आदिवासीबांधवांना किराणा किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 09:36 PM2021-05-12T21:36:43+5:302021-05-13T00:28:09+5:30
इगतपुरी : कोरोनामुळे इगतपुरी, कसारा येथील अतिदुर्गम पाड्यातील गोरगरीब आदिवासी बांधवाचा रोजगार गेल्याने पोटभर दोन घास मिळावे यासाठी आपत्ती व्यवस्थापन टिमने व्हाट्सअप ग्रुपतर्फे ठिकठिकाणी अन्नधान्य व किराणा किटचे वाटप करण्यात आले.

काही ठिकाणी पौष्टिक आहार तयार करून वाटप करण्यात आला. तब्बल ९८ हुन अधिक कुटूंबाना तर ३८ निराधार नागरिकांना किटचा लाभ देण्यात आला. काही जीवनावश्यक वस्तूसह अन्नदान सामाजिक संस्था ठाणे यांनी दिलेल्या पौष्टिक आहाराचे वाटप व काही ठिकाणी संस्थेने दिलेल्या किटमधील पौष्टिक आहार अन्नछत्राच्या माध्यमातून आहार तयार करून वाटप करण्यात आला.
विशेष म्हणजे सुरु असलेल्या अन्नछत्र उपक्रमाचा निराधार, अनाथ, रस्त्यावरील भटके यांना लाभ होत आहे. विहिरीचा पाडा, फणस पाडा, उम्बरमाळी, वारलीपाडा व खर्डी ते कसारा घाटापर्यंतच्या मुंबई आग्रा महामार्गावरील दुर्बल घटकांना अन्नछत्राच्या वतीने लाभ देण्यात आला.
आपत्ती व्यवस्थापन टीम ग्रुपचे शाम धुमाळ, ग्रुप सदस्य दत्ता वाताडे, मनोज मोरे, महेंद्र माने, विनोद आयरे, राजेश जाधव, धोंगडे महाराज, राजेश चव्हाण, रवि चांगील आदी परीश्रम घेवून हे मोफत अन्नछत्र चालवित आहेत.