भोकणीकरांना घरपोच रेशनिंग वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:11 AM2021-04-29T04:11:07+5:302021-04-29T04:11:07+5:30
सिन्नर: तालुक्यातील भोकणी येथील ग्रामपंचायत व भोकणी ग्रामविकास मंच यांच्या सौजन्याने भोकणी ग्रामस्थांना घरपोच रेशनिंग धान्यवाटप करण्यात येत आहे. ...
सिन्नर: तालुक्यातील भोकणी येथील ग्रामपंचायत व भोकणी ग्रामविकास मंच यांच्या सौजन्याने भोकणी ग्रामस्थांना घरपोच रेशनिंग धान्यवाटप करण्यात येत आहे. घरपोच रेशनिंग धान्य वाटप करणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याने भोकणी ग्रामपंचायत प्रशासनाने पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केलेला आहे. या पाच दिवसांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता किराणा दुकान, हॉटेल, टपरीधारक, पिठाची गिरणी, रेशनिंग दुकान बंद राहणार आहे. परंतु रेशनिंगपासून ग्रामस्थ वंचित राहू नये, म्हणून सरपंच अरुण वाघ यांनी तहसीलदार राहुल कोताडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून जनता कर्फ्यूत रेशनिंग धान्य वाटपासंदर्भात चर्चा केली असता, घरपोच धान्य वितरण करता येऊ शकते, असा सल्ला तहसीलदार कोताडे यांनी दिला.
त्यानंतर, कोरोना नियमांचे पालन करत सरपंच अरुण वाघ, ग्रामपंचायत सदस्य कांताराम कुर्हाडे, शिवाजी सानप, शरद साबळे, उपसरपंच मनीषा साबळे, रेशन दुकानदार वसंत साबळे, ग्रामविकास मंचचे रितेश मालाणी, संपत ओहळ, आण्णा साबळे, जालिंदर साबळे, संदीप वाघ, सुरेश साबळे यांच्या उपस्थितीत नागरिकांना घरपोच रेशनिंग धान्य वाटप प्रक्रिया सुरुवात करण्यात आली.
---------------------
सरपंच वाघ यांचा पुढाकार
जनता कर्फ्यू घोषित केल्यानंतर ग्रामस्थांनी धान्यासाठी अडचण होऊ नये, अशी सरपंच अरुण वाघ यांची अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन सूत्रे हलविली आणि ग्रामस्थांची संभाव्य गैरसोय दूर झाली. ग्रामस्थांना घरपोच रेशनिंगचे धान्य मिळाले. वाघ यांच्या या पुढाकाराचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
--------------
सिन्नर तालुक्यातील भोकणी येथे घरपोच धान्य वितरणप्रसंगी सरपंच अरुण वाघ, वसंत साबळे यांच्यासह ग्रामविकास मंचचे रितेश मालाणी आदी. (२८ सिन्नर १)
===Photopath===
280421\28nsk_3_28042021_13.jpg
===Caption===
२८ सिन्नर १