घरपोच पाठ्यपुस्तकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:38 PM2020-06-25T16:38:13+5:302020-06-25T16:40:01+5:30
औंदाणे : बागलाण तालुक्यातील शाळांमध्ये पिहल्या दिवशी शाळा उघडली नसली तरी तालुकास्तरावरून 398 शाळा ना 2 लाख 84 हजार मोफत पाठय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंदाणे : बागलाण तालुक्यातील शाळांमध्ये पिहल्या दिवशी शाळा उघडली नसली तरी तालुकास्तरावरून 398 शाळा ना 2 लाख 84 हजार मोफत पाठय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
शिक्षकांनी खेडोपाडयातील आदिवासी वस्ती मध्ये असलेल्या मुलांना घरपोच मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले.
कोरोणामुळे शाळा पिहल्या दिवशी उघडली नसली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणकि नुकसान होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणेने शिक्षकांच्या मदतीने तालुक्यातील 21 केंद्रातील 398 शाळांना पिहली ते आठवीतील 50 हजार 38 लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन लाख 84 हजार पुस्तके वाटप केले.
शिक्षकांना पिहल्या दिवशी शाळामधी हजेरी लावुन शाळा स्वच्छता करु न घेतली व मुलाना घरपोच मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली. शिक्षकांनी पुस्तके वाटप करून पिहली त नवीन दाखल पात्र विद्यार्थी दाखल केले.
पुस्तकांचे वितरणाचे नियोजन गटशिक्षणाधिकारी टि. के. घोंगडे विस्तार अधिकारी कैलास पगार, विजय पगार, वाय. एन. आहिरे यांनी केले होते.