नायगाव येथे होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 06:42 PM2020-06-09T18:42:34+5:302020-06-09T18:42:45+5:30

नायगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायतीच्या वतीने अ‍ॅरसॅनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांचे ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.

Distribution of homeopathic pills at Naigaon | नायगाव येथे होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

नायगाव येथे होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

Next

नायगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायतीच्या वतीने अ‍ॅरसॅनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांचे ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.  ग्रामस्थांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अंगणवाडी शिक्षक, मदतनीस आणि आशासेविका यांच्यामार्फत घरोधरी जाऊन गोळ्यांचे वाटप करण्यात आले. आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायतीने लाँकडाऊनच्या काळात गरीब व गरजू लोकांना धान्य, सॅनिटायझर आदींचे मोफत वाटप केले होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप, सरपंच छाया नवाळे, उपसरपंच सोमनाथ दराडे, पोलीसपाटील मोहन सांगळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू नवाळे, माजी सरपंच संजय सानप आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of homeopathic pills at Naigaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक