मायको फोरमच्या मानव सेवा पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 11:45 PM2020-02-02T23:45:09+5:302020-02-03T00:21:03+5:30
मायको फोरमच्या ३१व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या पाच समाजसेवकांना मानव सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सिडको : मायको फोरमच्या ३१व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या पाच समाजसेवकांना मानव सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सिंहस्थनगर येथील मानव सेवा केंद्रात मानव सेवा पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, बॉश कंपनीचे जनरल मॅनेजर श्रीकांत चव्हाण, नीलेश फणसे, उद्योजक संजय शाह, निशांत जाधव, श्रीकांत जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी महापौर सतीश कुलकर्णी यांनी सर्व पुरस्कारांर्थीनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळी श्रीकांत चव्हाण, सुनील कडासने, नीलेश फणसे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे एम रॉय, सुवर्णा मेतकर, सतीश कुलकर्णी, प्रतिभा आहेर आणि सागर गडाख यांना मानव सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविक माजी अध्यक्ष अश्फाक कागदी यांनी केले. सूत्रसंचालन राजू नाईक व सचिव संजय कुºहे यांनी केले. आभार अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी मानले. याप्रसंगी अविनाश दशपुते, बी. ए. सोनवणे, जे. एन. पटेल, मधुकर भाले, वासुदेव उगले, हेमंत सूर्यवंशी, सुधीर गोसावी आदी उपस्थित होते.