गुळवंचला आरोग्यपूरक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:11 AM2021-06-05T04:11:18+5:302021-06-05T04:11:18+5:30
बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली सिन्नर : शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ग्राहकांची विविध कामांसाठी गर्दी होत आहे. मागील दोन महिन्यानंतर बाजारपेठ ...
बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली
सिन्नर : शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ग्राहकांची विविध कामांसाठी गर्दी होत आहे. मागील दोन महिन्यानंतर बाजारपेठ खुली झाल्याने व्यापारी वर्गाची बँकेतील कामे वाढली आहेत. यामुळे सर्वच बँकांमध्ये दुपारी २ वाजेपर्यंत ग्राहक पैसे काढणे तसेच पैसे पाठविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे चित्र आहे.
कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी
नांदूरशिंगोटे : खरिपाच्या पेरण्या तोंडावर आल्या आहे. पेरणीपूर्व तयारी म्हणून काही सधन शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी केली आहे. येथे व परिसरात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. निर्बंध सैल होताच शेतकऱ्यांनी बियाणे व खत खरेदीसाठी कृषी केंद्रांकडे धाव घेतली.
ग्रामीण भागात बाजारपेठेत गर्दी
नांदूरशिंगोटे : शहराबरोबरच ग्रामीण भागातही सर्वच प्रकारचे दुकाने सुरू झाल्याने बाजारपेठा गजबजल्या होत्या. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढली होती. दोन महिने कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने ग्राहकांची वर्दळ कमी होती. कोरोना अजून संपलेला नाही, तरी नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासनाने नियम पाळण्याचे आवाहन करूनही नागरिक अनेक दुकानांवर गर्दी करताना दिसून येते.
दापूर परिसरात वीज पुरवठा सुरळीत
नांदूरशिंगोटे : तालुक्यातील दापूर भागात वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. प्रामुख्याने यामध्ये सर्वाधिक फटका वीज वितरण कंपनीला बसला होता. शंभरहून अधिक विजेचे पोल परिसरात कोसळले होते. त्यामुळे काही भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी अहोरात्र काम करत वीज पुरवठा सुरळीत चालू केला आहे.
शेणखतांंना शेतकऱ्यांचे प्राधान्य
नांदूरशिंगोटे : गेल्या दोन वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने हवालदिल झालेले शेतकरी आता शेणखत व गांडूळ खतांना प्राधान्य देत आहेत. एकीकडे रासायनिक खतांच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाच्या किमतीत घट होताना दिसून येत आहे.